JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:59 IST2017-09-20T19:58:12+5:302017-09-20T19:59:02+5:30

सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे.

JioFi Festive Offer: Reliance Jio offers exclusive offers to customers, JioFi devices will be available at just Rs 999 | JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

मुंबई, दि. 20 -  सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे.
सणासुदीच्या दिवसांसाठी जिओकडून देण्यात आलेली ही ऑफर मात्र मर्यादित दिवसांसाठी असेल. त्यामुळे ग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.
आता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.
रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणाऱ्या रिलायन्स रिटेलने केला होता. रिलायन्स जिओच्या वाढत्या फोनच्या मागणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. कंपनीचे बाजार भांडवल 5.52 लाख कोटींवर पोचले आहे.

Web Title: JioFi Festive Offer: Reliance Jio offers exclusive offers to customers, JioFi devices will be available at just Rs 999

टॅग्स :Mobileमोबाइल