शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Jio 5G Welcome Offer: दसऱ्यापूर्वीच मोठा ट्विस्ट! रिलायन्स Jioच्या 5G साठी तयार रहा! उद्यापासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:02 IST

एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.  

एअरटेलने पहिल्याच दिवशी ५जी आठ शहरांत सुरु करून रिलायन्स जिओला मोठा धक्का दिला होता. असे असताना एअरटेलची ही खेळी परतवून लावण्यासाठी रिलायन्स जिओने उद्याच ५जी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चार शहरांत Reliance Jio 5G network सुरु केले जाणार आहे. 

एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.  

दसऱ्याच्याच दिवशी Jio True 5G सेवा ही दिल्ली, वाराणसी, मुंबई आणि कोलकाता या चार शहरांत सुरु होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होत आहे. परंतू, सर्वच ५जी मोबाईल युजर ही सेवा वापरू शकणार नाहीत. कंपनीने यासाठी वेलकम ऑफर जारी केली आहे. यानुसार कंपनी तुम्हाला ५जी नेटवर्क वापरण्याची संधी देणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीला फिडबॅक देऊ शकणार आहात. 

जिओने ५जी सेवा इन्व्हाईट बेस्ड ठेवली आहे, म्हणजेच कंपनी ग्राहकांना ५जी सेवा वापरण्यासाठी निमंत्रित करणार आहे. ज्यांना हे निमंत्रण मिळेल तेच लोक जिओची ५जी सेवा वापरू शकणार आहेत. किती ग्राहकांना कंपनी निमंत्रीत करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाहीय. यानुसार १ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड आणि अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. कंपनी 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँडवर सेवा देईल. जिओ ही एकमेव कंपनी आहे जी ७०० मेगाहर्ट्झच्या बँडवर ५जी सेवा पुरवते. यामुळे तुम्हाला चांगले नेटवर्क कव्हरेज मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :5G५जीJioजिओReliance Jioरिलायन्स जिओ