शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:06 IST

Jio : ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने लिस्टमध्ये जास्त व्हॅलिडिटी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे.

रिलायन्स जिओकडे (Jio) ग्राहकांसाठी विविध मोबाईल रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. जिओने या वर्षी जुलै महिन्यात आपल्या प्लॅन्सच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे अपडेट केले होते. कंपनीने अनेक प्लॅन्स लिस्टमधून हटवले होते आणि काही प्लॅन्सच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या. मात्र, जिओकडे अजूनही असे अनेक प्लॅन्स आहेत, जे ग्राहकांना जास्त आवडतात.

दरम्यान, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने लिस्टमध्ये जास्त व्हॅलिडिटी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एकापेक्षा जास्त प्लॅन्स आहेत. जर तुम्ही जिओचे सिम वापरत असाल तर 84 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी खूप किफायतशीर ठरू शकते.

जिओच्या लिस्टमधील परवडणारा रिचार्ज प्लॅनजिओच्या पोर्टफोलिओमधला 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची ऑफर दिली जाते. तुम्ही हा प्लॅन घेतल्यास, तुम्ही एकाच वेळी जवळपास 3 महिन्यांसाठी रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. फ्री कॉलिंगसोबत, जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 100 फ्री एसएमएसची सुद्धा सुविधा देत आहे.

दररोज 1.5GB डेटा वापरता येणारया 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा ऑफरबद्दल बोलायते झाल्यास, यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी एकूण 126GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा वापरता येणार आहे. दरम्यान, लक्षात असू द्या की, जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड ट्रू  5G डेटा ऑफरसह येत नाही. त्यामुळे तुम्हाला यामध्ये फ्री 5G डेटाचा लाभ मिळणार नाही.

अतिरिक्त बेनिफिट्सजिओ आपल्या ग्राहकांसाठी इतर प्लॅन्सप्रमाणे काही अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. जर तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cloud वर फ्री अॅक्सेस दिला जातो.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनMobileमोबाइल