Jio ची दिवाळी धमाका ऑफर; संपूर्ण वर्षभरासाठी मिळेल मोफत हायस्पीड इंटरनेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:10 IST2024-10-27T14:59:06+5:302024-10-27T15:10:59+5:30
रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर आणली आहे.

Jio ची दिवाळी धमाका ऑफर; संपूर्ण वर्षभरासाठी मिळेल मोफत हायस्पीड इंटरनेट
Jio Reacharge Offer : काही काळापासून खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक नाराज आहेत. पण, फास्ट इंटरेनेट सेवा मिळतात, त्यामुळे ग्राहक वाढीव किमतीत रिचार्ज खरेदी करत आहेत. यात Jio च्या ग्राहकांचाही समावेश आहे. किंमत जास्त असली तरी, फास्ट सेवा मिळते, त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. दरम्यान, Jio ने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त एक उत्तम ऑफर आणली आहे. या दिवाळी धमाका ऑफरमध्ये Jio आपल्या ग्राहकांना वर्षभर मोफत इंटरनेट सुविधा देत आहे.
रिलायन्स जिओची नवीन दिवाळी धमाका ऑफर तुमच्या सणासुदीला आणखी खास बनवणार आहे. तुम्ही Jio च्या या नवीन ऑफरचा लाभ घेतला, तर तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण वर्षभर डेटा संपवण्याचे टेंशन राहणार नाही. या ऑफर अंतर्गत तुम्हाला हाय स्पीडमध्ये 5G डेटा मिळेल.
ऑफरचा लाभ कसा घ्यायचा?
रिलायन्स जिओची नवीन दिवाळी धमाका ऑफर रिलायन्स डिजिटल किंवा मायजिओ स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जर तुम्ही Jio च्या या दोन प्लॅटफॉर्मवरून 20 हजार रुपयांची खरेदी केली, तर कंपनी तुम्हाला एक वर्षासाठी मोफत डेटा मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर आहे. याशिवाय, कंपनी दिवाळी ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ 2,222 रुपयांमध्ये 3 महिन्यांचा Jio Air Fiber प्लॅन देत आहे.
कंपनी ग्राहकांना 12 कूपन देईल
दिवाळी ऑफरमध्ये जिओ आपल्या एअर फायबर ग्राहकांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत अॅडव्हान्स रिचार्जमध्ये एकूण 12 कूपन प्रदान करेल. ग्राहकांना मिळालेली ही कूपन अॅक्टिव्ह जिओ एअर फायबर प्लॅनच्या बरोबरीची असेल. हे कूपन रिलायन्स डिजिटल, माय जिओ ॲप, जिओ पॉइंट किंवा जिओ मार्ट डिजिटल एक्सक्लुझिव्ह स्टोअरवर रिडीम केले जाऊ शकतात.