Jio चा दमदार प्लान; 1234 रुपयांत 336 दिवसांची वैधता अन् दररोज इतका GB डेटा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 20:29 IST2026-03-23T20:28:24+5:302026-03-23T20:29:42+5:30
Jio Prepaid Plan: जाणून घ्या या खास प्लानचे फायदे...

Jio चा दमदार प्लान; 1234 रुपयांत 336 दिवसांची वैधता अन् दररोज इतका GB डेटा...
JioRecharge Plan: कमी किमतीत जास्त वैधता असलेले मोबाईल रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने एक खास प्लान आणला आहे. ₹1234 च्या रिचार्जमध्ये तब्बल 336 दिवसांची वैधता मिळते. विशेष म्हणजे, एवढ्या कमी किमतीत इतकी मोठी वैधता देणारा प्लॅन सध्या एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांच्याकडेही उपलब्ध नाही.
या प्लानमध्ये ग्राहकांना खालील सुविधा मिळतात:
दररोज 0.5 GB हाय स्पीड डेटा
अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
28 दिवसांत 300 SMS
डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 kbps पर्यंत कमी होते
JioSaavn आणि JioTV चे मोफत सबस्क्रिप्शन
336 दिवसांत मिळणारा एकूण डेटा
या प्लानची वैधता 336 दिवस असल्यामुळे दररोज 0.5 GB प्रमाणे ग्राहकांना एकूण 168 GB डेटा मिळतो. हा प्लॅन विशेषतः जास्त डेटा न वापरणारे पण जास्त वैधता हवी असलेले ग्राहक लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
हा प्लान सर्वांसाठी नाही
महत्त्वाची बाब म्हणजे हा प्लॅन सर्व जिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. हा प्लॅन फक्त JioBharat Phone वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांकडे जिओ भारत फोन आहे, तेच या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.
Airtel आणि Vi कडे पर्याय आहे का?
सध्या Airtel आणि Vodafone Idea (Vi) कडे 336 दिवसांची वैधता असलेला आणि इतक्या कमी किमतीत उपलब्ध असलेला कोणताही प्लॅन नाही. त्यामुळे दीर्घ वैधता आणि कमी खर्चाच्या दृष्टीने जिओचा हा प्लॅन स्वस्त पर्याय मानला जात आहे.
ज्या ग्राहकांना दररोज जास्त डेटा नको पण कमी किमतीत वर्षभराची वैधता हवी आहे, त्यांच्यासाठी रिलायन्स जिओचा ₹1234 चा 336 दिवस वैधतेचा प्लॅन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः JioBharat फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर मानला जात आहे.