Jio Fiber New Plans: Jio ने लाँच केले नवीन प्लॅन्स; २०० रुपयांत १४ ओटीटींची मजा, ते ही भन्नाट स्पीडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:43 IST2022-04-19T20:42:54+5:302022-04-19T20:43:13+5:30
फोर जी सेवा लाँच करून पहिल्याच झटक्यात भारतातील सर्वाधिक पसंतीची टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओने एअरटेल, आयडियासारख्या तगड्या गड्यांना पुरते चीतपट केले आहे.

Jio Fiber New Plans: Jio ने लाँच केले नवीन प्लॅन्स; २०० रुपयांत १४ ओटीटींची मजा, ते ही भन्नाट स्पीडमध्ये
फोर जी सेवा लाँच करून पहिल्याच झटक्यात भारतातील सर्वाधिक पसंतीची टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओने एअरटेल, आयडियासारख्या तगड्या गड्यांना पुरते चीतपट केले आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीने जिओ फायबर सेवा लाँच केली होती, आता त्या ग्राहकांना २२ एप्रिलपासून नवीन प्लॅन्सचा लाभ घेता येणार आहे.
जिओ फायबरच्या ३९९ आणि ६९९ रुपयांच्या बेसिक प्लॅन्सवर ३० आणि १०० एमबीपीएस अनलिमिटेड स्पीड मिळत होता. आता या प्लॅन्ससोबत जिओ ग्राहकांना जबरदस्त एंरटेन्मेंट पहायला मिळणार आहे. या नव्या प्लॅन्सचा लाभ नवीन आणि जुने ग्राहक घेऊ शकणार आहेत.
यासाठी ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना १०० किंवा २०० रुपये अधिक मोजून १४ ओटीटी अॅपचा लाभ घेऊ शकणार आहेत. १०० रुपयांत सहा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि २०० रुपयांत १४ अॅप आहेत. या ओटीटी अॅप्समध्ये डिज़्नी+ हॉटस्टार, Zee5, Sonyliv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, Altbalaji, Eros Now, Lionsgate, ShemarooMe, Universal+, Voot Kids, JioCinema यांचा समावेश आहे.
याचबरोबर नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने पोस्टपेड युजर्ससाठी एन्ट्री कॉस्ट शून्य करून टाकली आहे. यामुळे नव्या युजरना १० हजार रुपयांच्या सेवा मोफत मिळणार आहेत. यामध्ये इंटरनेट बॉक्स, सेट टॉप बॉक्स आणि इंन्स्टॉलेशन चार्जेस माफ केले जाणार आहेत. यासाठी ग्राहकांना जियोफाइबर पोस्टपेड कनेक्शनचा प्लॅन घ्यावा लागणार आहे.