Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 22:04 IST2019-12-04T22:02:15+5:302019-12-04T22:04:11+5:30
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे.

Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
नवी दिल्लीः रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे. जिओचे हे टॅरिफ प्लॅन सहा डिसेंबरपासून लागू होणार आहेत. जिओनं आपले नवे टॅरिफ प्लॅन हे व्होडाफोन आणि एअरटेल, आयडियाच्या तुलनेत 15 ते 25 टक्के स्वस्त ठेवले आहेत. या सर्व प्लॅनबरोबर जिओ टीव्हीवर 600हून अधिक चॅनेल पाहायला मिळणार आहेत. तसेच जिओ सिनेमावर 10000+ सिनेमे आणि अनेक कार्यक्रम पाहता येणार आहेत. तसेच क्लाऊडवर 5 जीबी स्टोरेजही मोफत मिळणार आहे.
दररोज 1.5 डेटा मिळणारे तीन प्लॅन जिओनं उपलब्ध करून दिले असून, 199 रुपये, 399 रुपये, 555 रुपयांपर्यंत आपण रिचार्ज करू शकता. तसेच 2,199 रुपयांच्या प्लॅनचाही यात समावेश आहे. 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यास 1 हजार मिनिट्स मिळणार आहे. तर जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनवर 56 दिवसांच्या वैधतेसह 2000 मिनिटं दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी मिळणार आहे. 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3,000 मिनिटे आणि 2,199 रुपयांच्या प्लॅनवर 365 दिवसांसाठी दुसऱ्या नेटवर्कवर 12,000 मिनिटं मोफत मिळणार आहेत.
जिओचे 28 दिवसांचे प्लॅन
199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जियो अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.
249 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि जियो अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.
349 रुपये- दररोज 3 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन
जिओचे 56 दिवसांचे प्लॅन
399 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन
444 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन
जिओचा 84 दिवसांचा प्लॅन
555 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटं आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन
599 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटं आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन
जिओचा 365 दिवसांचा प्लॅन
2,199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्सक्रिप्शन