शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:19 IST

मोबाईल कंपन्यांनी सहा-सात वर्षांपूर्वी भारतीयांच्या खिशावर मोठा दरोडा टाकला होता आणि करोडो भारतीय ग्राहक बोटे मोडण्यापलिकडे काही करू शकले नव्हते.

बीएसएनएलसह (जिओ सोडून) सर्व मोबाईल कंपन्यांनी सहा-सात वर्षांपूर्वी भारतीयांच्या खिशावर मोठा दरोडा टाकला होता आणि करोडो भारतीय ग्राहक बोटे मोडण्यापलिकडे काही करू शकले नव्हते. जिओ येण्यापूर्वी बीएसएनएल असेल की व्होडाफोन की आयडिया किंवा एअरटेल या कंपन्यांनी लाईफटाईम व्हॅलिडिटीच्या नावाखाली हजार-दोन हजार रुपयांची रिचार्ज खपविली होती. तसेच कंपन्यांनी सिमकार्ड विकतानाही लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणून सिम विकली होती. परंतू, जिओने फोरजी लाँच केल्यानंतर महिन्याचे रिचार्ज, महिन्याचीच व्हॅलिडीटी काढताच या कंपन्यांनी देखील या लाईफटाईम व्हॅलिडिटीवर दरोडा टाकत महिन्याचे रिचार्ज करा, तेवढेच दिवस नेटवर्क वापरा असा प्रघातच सुरु केला होता. आता तो देखील कालबाह्य होण्याची चिन्हे आहेत. 

कारण आता या टेलिकॉम कंपन्या या महिन्याच्या रिचार्जमध्ये दर दिवसाला देत असलेला डेटा आता तासाच्या हिशेबाने देण्यावर विचार करत आहेत. तासाच्या हिशेबाने जिओ आणि एअरटेलने डेटा देण्यास सुरुवात केली आहे. सध्यातरी हा तासाच्या हिशेबाने डेटा प्लॅन असला तरी भविष्यात तो महिन्याच्या इंटरनेट प्लॅनसोबतही जोडला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच रिचार्ज महिन्याचे करायचे आणि दर दिवसाला तासाच्या हिशेबाने तुम्हाला डेटा मिळणार. 

आतापर्यंत तुम्हाला दिवसाला १ जीबी, दीड, दोन जीबी डेटा मिळत होता. तो तुम्ही दिवसाला कधीही वापरा. पण आता जिओ आणि एअरटेलने ११ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे, त्यात तुम्हाला १० जीबी डेटा मिळणार तो ही केवळ १ तासासाठी. सध्यातरी ही अॅड ऑन ऑफर आहे. पण ती भविष्यात कायमचीच कधी होईल हे देखील तुम्हाला कळणार नाही, त्या लाईफटाईम व्हॅलिडिटीसारखी. जे लोक एखाद्या ठराविक काळासाठी खूप जास्त डेटा वापरतात त्यांच्यासाठी सध्या हा प्लॅन आहे. परंतू, यामुळे देशातील डेटाची किंमत, त्याचा वापर करण्याची पद्धत मात्र बदलणार आहे. 

सध्या या ११ रुपयांच्या डेटाचा वापर तुम्ही मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट, आयपीएल सारख्या मॅच पाहणे किंवा एखादी सिरिअल, वेबसिरीज पाहणे डाऊनलोड करणे यासाठी केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओAirtelएअरटेल