शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हाय स्पीड 5G इंटरनेट; 19 सप्टेंबरपासून मिळणार Jio AirFiber, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:31 IST

Jio AirFiber ची कमर्शिअल लॉन्चिंग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.

नवी दिल्ली: रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत Jio AirFiber लॉन्चिंगची घोषणा केली. येत्या 19 सप्टेंबर 2023 पासून याची विक्री सुरू होईल. जिओ एअरफायबरद्वारे देशातील दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, हा यामागचा हेतू आहे.

तुम्ही Jio Fiber बद्दल ऐकले असेलच, त्याचा वापरही अनेकजण करत आहेत. पण, आता जे नवीन डिव्हाइस लॉन्च होत आहे, त्याचे नाव Jio AirFiber आहे. नावाप्रमाणेच, हे वायरलेस असेल. Jio AirFiber कसे काम करेल आणि हे Jio Fiber पेक्षा किती वेगळे आहे, हे जाणून घेऊ.

Jio Fiber हे एक हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन आहे, ज्यात इंटरनेट पुरवण्यासाठी ऑप्टिकल फायबर वापरले गेले आहे. पण, JioFiber लाही इंटरनेट पुरवण्यासाठी प्रत्यक्ष वायरिंगची आवश्यकता नाही. याद्वारेही देशातील अनेक दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा पुरवली जाऊ शकते. आता लॉन्च होणारे Jio AirFiber याचेच अपडेटेट व्हर्जन असेल. याद्वारे हाय स्पीड 5G सेवा पुरवली जाईल.

Jio AirFiber कसे वापरावे?Jio AirFiber वापरण्यासाठी अँटेना आणि राउटरची आवश्यकता असेल. प्लग इन केल्यानंतर याचे काम सुरू होईल. याद्वारे ऑफिस किंवा घर हाय-स्पीड इंटरनेटशी सहजपणे जोडले जाऊ शकते. Jio AirFiber लांब अंतराच्या कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीच्या 5G नेटवर्कचा वापर करेल. हे 5G हॉटस्पॉट उपकरण असेल. म्हणजेच हे मोबाईलप्रमाणे थेट टॉवरशी जोडले जाईल आणि हायस्पीड नेटवर्क देईल.

Jio Air Fiber ची किंमत काय असेल?सध्या Jio AirFiber ची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. नुकतेच असे सांगण्यात आले आहे की Jio AirFiber चे व्यावसायिक लॉन्च यावर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबर रोजी केले जाईल. तुमच्या जवळच्या जिओ रिटेल स्टोअर, जिओ अॅप आणि कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकाल.

टॅग्स :JioजिओMukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट