सारखं वाय-फाय बंद पडतंय? वैतागू नका, घराच्या 'या' कोपऱ्यात ठेवा राऊटर आणि पाहा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:28 IST2026-02-12T18:27:29+5:302026-02-12T18:28:19+5:30

अचानक वाय-फाय डिस्कनेक्ट झालं की रंगाचा बेरंग होतो. वाय-फाय वारंवार ड्रॉप होणं ही आजच्या डिजिटल युगातील मोठी डोकेदुखी ठरतेय.

Is your Wi-Fi suddenly shutting down? Don't worry, just place the router in 'this' corner of the house and see how great it is! | सारखं वाय-फाय बंद पडतंय? वैतागू नका, घराच्या 'या' कोपऱ्यात ठेवा राऊटर आणि पाहा कमाल!

सारखं वाय-फाय बंद पडतंय? वैतागू नका, घराच्या 'या' कोपऱ्यात ठेवा राऊटर आणि पाहा कमाल!

महत्त्वाची ऑफिस मीटिंग असो, आवडत्या वेब सीरिजचं स्ट्रीमिंग असो किंवा ऑनलाईन गेमिंगचा थरार; अशा वेळी अचानक वाय-फाय डिस्कनेक्ट झालं की रंगाचा बेरंग होतो. वाय-फाय वारंवार ड्रॉप होणं ही आजच्या डिजिटल युगातील मोठी डोकेदुखी ठरतेय. अनेकदा आपण इंटरनेट प्रोव्हायडरला दोष देतो, पण समस्या तुमच्या घरातील राऊटर किंवा त्याच्या सेटिंगमध्येही असू शकते. नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाय-फाय डिस्कनेक्ट होतं आणि ते कसं दुरुस्त करायचं, याच्या काही सोप्या टिप्स प्रत्येकाला माहीत हव्यात.. 

१. राऊटरवर वाढलाय 'लोकेशन'चा भार? 

जर तुमच्या वाय-फायशी गरजेपेक्षा जास्त उपकरणं कनेक्ट असतील, तर कनेक्टिव्हिटी ड्रॉप होण्याची शक्यता असते. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि घरातील इतर गॅजेट्स जरी डेटा वापरत नसले, तरी ते बँडविड्थ कंज्युम करतात. यामुळे राऊटरवर लोड येतो. त्यामुळे जे डिव्हाईस वापरात नाहीत, त्यांचं वाय-फाय बंद करा. यामुळे इंटरनेटचा स्पीड आणि स्थिरता वाढेल.

२. राऊटरची जागा चुकली तर नाही ना? 

वाय-फाय सिग्नल स्ट्रॉन्ग राहण्यासाठी राऊटरची जागा अत्यंत महत्त्वाची असते. जर तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल राऊटरपासून खूप लांब असेल किंवा मध्ये भिंतींचा अडथळा असेल, तर कनेक्शन वारंवार तुटू शकतं. तसेच, राऊटर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या मागे किंवा कोपऱ्यात लपवून ठेवू नका. राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंचावर ठेवा. ओव्हन, फ्रीज किंवा टिव्ही सारख्या उपकरणांपासून राऊटर लांब ठेवा, कारण त्यांच्या लहरींमुळे सिग्नलमध्ये अडथळा येतो.

३. राऊटर जुना झालाय का? 

तुम्ही सर्व उपाय करूनही जर वाय-फाय डिस्कनेक्ट होत असेल, तर कदाचित तुमच्या राऊटरची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. जुने राऊटर सध्याच्या हाय-स्पीड इंटरनेट सर्व्हिसेसशी सुसंगत नसतात. ते वारंवार रिसेट करावे लागतात आणि काही वेळानंतर पुन्हा बंद पडतात. जर राऊटर खूप जुना असेल, तर नवीन तंत्रज्ञानाचा राऊटर घेणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

४. सॉफ्टवेअर अपडेटकडे लक्ष द्या 

अनेकदा राऊटरचं फर्मवेअर जुनं झाल्यामुळे तांत्रिक अडचणी येतात. राऊटर मॅन्युफॅक्चरर वेळोवेळी अपडेट्स देत असतात, जे आपण दुर्लक्षित करतो. राऊटरच्या सेटिंगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट आहे का ते तपासा. यामुळे अनेक छोटे बग्स आपोआप दूर होतात. इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी आणि वाय-फाय स्टेबल ठेवण्यासाठी या छोट्या पण प्रभावी टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील.

Web Title : बार-बार वाई-फाई डिस्कनेक्ट? राउटर की जगह बदलकर सिग्नल बेहतर करें।

Web Summary : वाई-फाई बार-बार डिस्कनेक्ट होता है? ज़्यादा डिवाइस, राउटर की गलत जगह, पुराना हार्डवेयर और सॉफ़्टवेयर समस्याएँ कारण हैं। राउटर को बीच में रखें, सॉफ़्टवेयर अपडेट करें, डिवाइस कम करें और नया राउटर लें।

Web Title : Fix frequent Wi-Fi drops: Optimize router placement for best signal.

Web Summary : Frequent Wi-Fi drops? Overloaded connections, poor router placement, outdated hardware, and software issues cause this. Place router centrally, update software, limit connected devices, and consider a new router for stable Wi-Fi.