तुमच्या फोनमध्ये सोने आहे का? मोबाईल ते सॅटेलाइट पर्यंत सोन्याचा वापर होतो; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:03 IST2025-03-26T19:03:25+5:302025-03-26T19:03:47+5:30

आपल्याकडे असणाऱ्या स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप या उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केला जातो.

Is there gold in your phone? Gold is used in everything from mobiles to satellites know the reason | तुमच्या फोनमध्ये सोने आहे का? मोबाईल ते सॅटेलाइट पर्यंत सोन्याचा वापर होतो; जाणून घ्या कारण

तुमच्या फोनमध्ये सोने आहे का? मोबाईल ते सॅटेलाइट पर्यंत सोन्याचा वापर होतो; जाणून घ्या कारण

सोन्याचा वापर आपल्याकडे फक्त महिलाच करतात. अनेक जण सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. पण, सोन्याचा वापर तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल, लॅपटॉप यामध्ये केला जातो. सोने हे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान उद्योगासाठी देखील खूप महत्वाचे आहे. उपग्रहांपासून स्मार्टफोनपर्यंत अनेक ठिकाणी सोन्याचा वापर केला जातो.

सोने ही पृथ्वीवर आढळणारी एक मौल्यवान धातू आहे, हा धातू अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी आवश्यक आहे. 

Technology: Whatsapp अपडेट केलंत का? Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर!

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये होतो वापर

स्मार्टफोनच्या सर्किट बोर्ड, कनेक्टर आणि प्रोसेसरमध्ये सोन्याचा वापर केला जातो.

लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या मदरबोर्ड, रॅम मॉड्युल आणि सीपीयूमध्ये सोन्याचा वापर केला जातो. 

टॅबलेट आणि आयपॅडच्या कनेक्टर आणि इंटीग्रेटेड सर्किटमध्ये सोन्याचा वापर केला जातो. 

सोने टीव्हीमध्येही वापरले जाते

टेलिव्हिजन सेटच्या सर्किट बोर्ड आणि कनेक्शन पॉइंट्समध्ये सोन्याचा वापर केला जातो.

डिजिटल कॅमेऱ्यांच्या अंतर्गत सर्किट्स आणि कनेक्टर्समध्ये खूप कमी प्रमाणात सोने वापरले जाते.  पण, या उपकरणांमध्ये सोनं कमी प्रमाणात वापरले जाते. 

कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्येही सोने वापरले जाते

संगणक हार्डवेअरमध्ये अनेक ठिकाणी सोन्याचा वापर केला जातो. मदरबोर्डच्या आत सोन्याचा मुलामा असलेल्या पिन  आणि कनेक्टरमध्ये सोन्याचा वापर केला आहे. सीपीयूच्या आत सोन्याचा मुलामा असलेल्या पिनमध्ये देखील वापरले जाते.

मोबाईल नेटवर्क टॉवर्समधील उच्च-फ्रिक्वेन्सी कनेक्टरमध्ये सोन्याचा वापर केला जातो. उपग्रह संप्रेषण उपकरणांच्या रिसीव्हर आणि अँटेनामध्ये सोन्याचा वापर केला जातो.

वैद्यकीय उपकरणांमध्ये सोने वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. यामध्ये पेसमेकर आणि डिफिब्रिलेटरचा समावेश आहे. श्रवणयंत्रांमध्येही सोन्याचा मुलामा असलेले कनेक्टर वापरले जातात. सोन्याचा वापर उच्च संवेदनशील सर्किटमध्ये केला जातो.

सोन्याचा वापर का केला जातो?

सोने हे विजेचे चांगले वाहक आहे आणि ते गंजत नाही.  विद्युत सिग्नल प्रसारित करू शकते. सर्व हार्डवेअरमध्ये जलद संवाद साधण्यासाठी सर्किट बोर्ड, कनेक्टर आणि मायक्रोचिप्समध्ये सोन्याचा वापर केला जातो.

अंतराळयान हे एक महागडे वाहन आहे. येथे सोन्याचा वापर वीज वाहक म्हणून आणि अनेक आवश्यक वायरिंगमध्ये केला जातो. 

Web Title: Is there gold in your phone? Gold is used in everything from mobiles to satellites know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.