६४ लाखांना विकला गेला जुना iPhone, कारण ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:58 PM2021-11-12T16:58:44+5:302021-11-12T16:59:39+5:30

iPhone इतर स्मार्टफोन्सपेक्षा तुलनेनं महाग असतात याची आपल्याला कल्पना आहेच. पण एक iPhone अन् तोही जुना असेल आणि तो जर ६४ लाख रुपयांना विकला गेला आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही.

iphone x with usb type c port sold for 64 lakh | ६४ लाखांना विकला गेला जुना iPhone, कारण ऐकून बसेल धक्का!

६४ लाखांना विकला गेला जुना iPhone, कारण ऐकून बसेल धक्का!

googlenewsNext

iPhone इतर स्मार्टफोन्सपेक्षा तुलनेनं महाग असतात याची आपल्याला कल्पना आहेच. पण एक iPhone अन् तोही जुना असेल आणि तो जर ६४ लाख रुपयांना विकला गेला आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण खरंच असं घडलं आहे. २०१७ सालचा मॉडल असलेला एक iPhone जवळपास ६४ लाख रुपयांना विकला गेला आहे. 

iPhone X फोन अॅपल कंपनीनं २०१७ साली लाँच केला होता. यातलाच एक फोन एका व्यक्तीनं ८६,००१ यूएस डॉलर्सला (जवळपास ६३.९६ लाख) विकला आहे. त्यामागचं कारण देखील मनोरंजक आहे. iPhone च्या सर्व फोन्सला चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट दिलं जातं. म्हणजेच काय तर आयफोनच्या फोनला दिलं जाणारं चार्जिंग आणि हेडफोन सॉकेट इतर कोणत्याही फोनसारखं नाही. पण यावेळी iPhone 13 मध्ये कंपनी USB Type C पोर्ट देईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण कंपनीनं या फोनमध्ये देखील काहीच बदल केला नाही. कंपनीनं आपलं वैशिष्ट्य असलेला लाइटनिंग पोर्टच फोन दिला. मग काय एका इंजिनिअर तरुणानं iPhone X ला USB C पोर्ट बसवलं आहे आणि ते यशस्वीरीत्या काम देखील करत आहे. 

iPhone X मध्ये Type C पोर्ट लावल्यानंतर त्यानं फोन eBay वर लिलावासाठी काढला. यात iMore नं केलेल्या दाव्यानुसार Type C चार्जिंग पोर्ट असलेला इतिहासातील पहिला आयफोन तब्बल ८६ हजार डॉलरला विकला गेला आहे. १ नोव्हेंबर रोजी USB Type C चार्जिंग सॉकेट असलेला iPhone X चा लिलाव करण्यात आला. हळूहळू सोशल मीडियात याची बातमी पसरल्यानतंर बोली वाढू लागली. सुरुवातीला १६०० डॉलरची बोली लागली होती. नंतर त्यात वाढ होऊन तब्बल ८६ हजार डॉलरपर्यंत बोली पोहोचली आहे. एका व्यक्तीनं या Type C चार्जिंग पोर्टवाल्या आयफोनसाठी ८६ हजार डॉलर मोजण्याची तयारी दाखवली. 

आयफोनमध्ये Type C चार्जिंग सॉकेट बसवणाऱ्या तरुणाचं नाव Ken Pillonel असं आहे. त्यानं तयार केलाला Type C चार्जिंग सॉकेट असलेला जगातील पहिला आयफोन ठरला आहे.  त्यानं आयफोन लावलेल्या टाइप-सी सॉकेटमधून फोन चार्जिंगसह डेटा ट्रान्सफरसाठी देखील वापर होतो. Ken Pillonel यानं स्विस फेडर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून रोबॉटिक विषयात शिक्षण घेतलं आहे. आता याच विषयात तो मास्टर डीग्री करत आहे. 

Read in English

Web Title: iphone x with usb type c port sold for 64 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.