भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:17 IST2025-08-05T13:16:17+5:302025-08-05T13:17:38+5:30
iPhone 17 Series: येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सीरिज लॉन्च होऊ शकते.

भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स...
iPhone 17 Series: अॅपलप्रेमी आयफोनच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, Apple येत्या 8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांची नवीन iPhone 17 सीरिज लॉन्च करू शकते. यावेळी कंपनी चार मॉडेल iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि नवीन iPhone 17 Air लॉन्च करू शकते. आयफोनचे "प्लस" मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय नसल्याने ते काढून टाकण्यात आले आहे.
कुठे स्वस्तात मिळणार?
मीडिया रिपोर्सनुसार, भारतात आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत सुमारे 79,900 रुपये असू शकते. तर, अमेरिकेत बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे $८९९ असू शकते, जी भारतापेक्षा स्वस्त आहे. तसेच, यूएईमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे AED 3,799 असू शकते. या किमती वाढण्याचे कारण अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि उत्पादन खर्चात वाढ असल्याचे सांगितले जात आहे.
डिझाइन आणि रंग
Apple ने यंदा आपल्या आयफोनच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत. तसेच, यात नवीन रंग पर्याय "Desert Titanium" मिळेल. हे नवीन मॉडेल ऑरेंज टोनसह earthy लुक देईल. Pro आणि Pro Max मॉडेल्स चार रंगांमध्ये उपलब्ध असतील. यात ब्लॅक, व्हाइट, डार्क ब्लू आणि डेझर्ट टायटेनियम सामील आहे. तसेच, डिस्प्ले साइझबद्दल सांगायचे झाले तर, iPhone 17 आणि 17 Pro मध्ये 6.3-इंच स्क्रीन मिळेल, तर iPhone 17 Air मध्ये 6.6-इंच आणि Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले मिळेल.
कॅमेरा कसा असेल
iPhone 17 सीरीजमध्ये अपग्रेडेड कॅमेरा मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार, या नवीन फोनमध्ये 24MP फ्रंट कॅमेरा मिळेल, ज्यात 6-एलिमेंट लेन्स असेल. तर, iPhone 17 Pro Max मध्ये एक नवीन 48MP टेलीफोटो लेंस आणि सध्याचे 12MP मेन लेन्स असेल. iPhone 17 सीरीजची प्री-ऑर्डर बुकिंग 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊ शकते. भारतातील आयफोनची मागणी पाहता, यंदा भारताला पहिल्या फेझच्या लॉन्चिंग लिस्टमध्ये सामील केले आहे.