शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:25 IST

एकीकडे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, आता आयफोन १७च्या डिलिव्हरी मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते.

IPhone 17 Series Delivery : गेल्या आठवड्यात 'अ‍ॅप्पल ऑ ड्रॉपिंग' या कार्यक्रमात ग्राहकांसाठी नवीन 'आयफोन १७' सीरिज आणि 'आयफोन एअर' लाँच करण्यात आले. अ‍ॅप्पलच्या नवीन सीरिजसाठी प्री-बुकिंग १२ सप्टेंबर पासून सुरू झाले आहे. आयफोनची ही नवीन सीरिज १९ सप्टेंबर पासून ग्राहकांना प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात होणार होती. एकीकडे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, आता ग्राहकांना डिलिव्हरी मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते. म्हणजेच आता नाव आयफोन प्रत्यक्षात हातात येण्यासाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट बघायला लागणार आहे. भारतातील किरकोळ विक्रेत्यांनाही स्टॉकची कमतरता भासत असल्याचे म्हटले जात आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, किरकोळ विक्रेत्यांनी देखील आयफोन १७ सीरिज आणि आयफोन एअरचा स्टॉक कमी मिळाल्याचे म्हटले आहे. आयफोनचा हा तुटवडा अ‍ॅप्पलच्या रिटेल नेटवर्कच्या विस्तारामुळे आहे, असे म्हटले जात आहे. विशेषतः आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा स्टोअर स्टॉक कमी झाला आहे.

कधी हातात येणार 'आयफोन १७'?

अ‍ॅप्पलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही आज (१५ सप्टेंबर) आयफोन १७चा २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट बुक केला, तर त्याची डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळेल. जर, तुम्ही आयफोन १७ प्रो ५१२ जीबी व्हेरिएंट बुक केला, तर डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळणार आहे.

जर, तुम्ही आयफोन १७ प्रो मॅक्स २ टीबी व्हेरिएंट बुक केला, तर डिलिव्हरीची तारीख ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान आहे. जर, तुम्ही आज आयफोन १७ एअरचा बेस व्हेरिएंट (गोल्ड रोझ) बुक केला तर, त्याची डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळू शकते. आयफोनच्या डिलिव्हरीची तारीख वेगवेगळ्या स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटनुसार बदलू शकते.

अहवालानुसार, भारतात नवीन आयफोन सीरिजचे उत्पादन सुरुवातीला बेस मॉडेलवर केंद्रित करण्यात आले आहे. प्रो आणि प्रो मॅक्स आयफोन मॉडेल्सच्या उत्पादनात काही आठवड्यांनंतर वाढ सुरू होते. सुमारे ५०० युनिट्सच्या शिपमेंटमध्ये, सुमारे ५० युनिट्स प्रोचे आहेत आणि १० युनिट्स प्रो मॅक्स मॉडेलचे आहेत. या अहवालानुसार, ५१२ जीबी आणि १ टीबी व्हेरिएंटचे युनिट्स देखील सध्या खूप कमी आहेत.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान