iPhone 17: आयफोन १७ प्रोच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट; टॉप मॉडेलवर पैसे वाचवण्याची मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:39 IST2026-02-21T19:36:29+5:302026-02-21T19:39:22+5:30

Amazon Mega Phone Mania Sale: अॅपलचा लेटेस्ट आणि सर्वात पॉवरफुल आयफोन १७ प्रो खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या मेगा फोन मानिया सेलमध्ये हा फोन बंपर डिस्काउंटसह मिळत आहे.

iPhone 17 Pro at 9,000 Off in Amazon Mega Phone Mania Sale | iPhone 17: आयफोन १७ प्रोच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट; टॉप मॉडेलवर पैसे वाचवण्याची मोठी संधी!

iPhone 17: आयफोन १७ प्रोच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट; टॉप मॉडेलवर पैसे वाचवण्याची मोठी संधी!

नवीन आयफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये आयफोन १७ प्रोवर मोठी कपात करण्यात आली. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या या प्रीमियम फोनवर हजारो रुपयांची बचत करण्याची संधी उपलब्ध असून, हा सेल रविवारपर्यंत (२२ फेब्रुवारी २०२६) सुरू राहणार आहे.

आयफोन १७ प्रोचा ५१२ जीबी व्हेरिएंट भारतात १ लाख ५४ रुपये ९०० किमतीत लॉन्च झाला. मात्र, अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ५ हजारांचे फ्लॅट कूपन डिस्काउंट मिळत आहे. निवडक बँकांच्या कार्डवर ₹४,००० ची अतिरिक्त सवलत दिली जात आहे. या दोन्ही ऑफर्स मिळून हा फोन आता १ लाख ४५ रुपये ९०० रुपयांना खरेदी करता येईल.

या फोनमध्ये ६.३-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३००० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनच्या संरक्षणासाठी सिरेमिक शील्ड आणि प्रीमियम लूकसाठी ॲल्युमिनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अत्यंत वेगवान A19 Pro Bionic प्रोसेसरवर चालतो. फोन गरम होऊ नये म्हणून यात विशेष व्हेपर चेंबर देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन गेल्या वर्षीच्या आयफोन १६ प्रोपेक्षा ४० टक्के अधिक चांगला परफॉर्मन्स देतो.

या फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ४८ मेगापिक्सेल प्रायमरी आणि ४८ एमपी अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी १८ मेगापिक्सेलचा मेरा देण्यात आला आहे. हा आयफोन लेटेस्ट iOS 26 सह येतो, ज्यामध्ये युजर्सना नवीन इंटरफेस आणि चांगल्या फीचर्सचा अनुभव मिळतो.

Web Title : iPhone 17 Pro: टॉप मॉडल की खरीदारी पर बंपर डिस्काउंट!

Web Summary : iPhone खरीदारों के लिए खुशखबरी! अमेज़न iPhone 17 Pro पर भारी छूट दे रहा है। पिछले साल लॉन्च हुए इस प्रीमियम फोन पर फ्लैट डिस्काउंट और बैंक ऑफर सहित 22 फरवरी, 2026 तक भारी छूट उपलब्ध है।

Web Title : iPhone 17 Pro: Bumper Discount Available on Top Model Purchase!

Web Summary : Great news for iPhone buyers! Amazon offers a massive discount on the iPhone 17 Pro. This premium phone, launched last year, is available with a significant price cut, including flat discounts and bank offers, until February 22, 2026.