iPhone लॉन्च होतो, तेव्हा स्क्रीनवर 9.41 वेळ का असते, काय आहे याची कहाणी..?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:04 PM2023-09-13T14:04:38+5:302023-09-13T14:05:21+5:30

Iphone 15 Photos and Price: जेव्हा आयफोन लॉन्च होतो, तेव्हा प्रत्येक मॉडेलच्या स्क्रीनवर 9:41 वेळ असते.

iphone-15-photos-and-price-in-india-know-why-all-apple-phones-display-941-reason | iPhone लॉन्च होतो, तेव्हा स्क्रीनवर 9.41 वेळ का असते, काय आहे याची कहाणी..?

iPhone लॉन्च होतो, तेव्हा स्क्रीनवर 9.41 वेळ का असते, काय आहे याची कहाणी..?

googlenewsNext

Iphone 15 Photos and Price: Apple ने काल(दि.12) आपली बहुप्रतिक्षित iPhone-15 सीरीज लॉन्च केली. अॅपलने या सीरिजमध्ये 4 नवीन फोन बाजारात आणले आहेत. Apple ने फोन लॉन्च केल्यानंतर आता iPhone-15 चे फीचर्स आणि त्याची किंमत सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनली आहे. याशिवाय, आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे.

काल झालेल्या लॉन्च इव्हेंटनंतर Iphone 15 चे अनेक फोटो व्हायरल झाले, ज्यात तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल. ती म्हणझे, फोनच्या स्क्रीनवर दिसणारी वेळ. आयफोनच्या सर्व फोटोंमध्ये स्क्रीनवर सकाळचे 9:41 ची वेळ दिसत आहे. हे वेळ फक्त iPhone-15 वरच नाही, तर यापूर्वीही लॉन्च झालेल्या सर्व iPhones मध्येही सेम वेळ दाखवण्यात आली आहे.

तुम्ही गुगलवर आयफोनचा फोटो सर्च केलात तर प्रत्येक फोनवर हीच 9.41 वेळ दिसेल. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, अॅपल नेहमी आपल्या फोटोंमध्ये ही वेळ का ठेवते. काय आहे 9.41 मिनिटांची कहाणी?

अॅपल फोनची कहाणी 16 वर्षांपूर्वी 2007 मध्ये सुरू झाली. ज्यावेळी पहिला iPhone लॉन्च झाला, तेव्हा स्टीव्ह जॉब्स हा लॉन्च करणार होते. त्यांना असे वाटले की, जेव्हा फोन लॉन्च होईल, तेव्हाची वेळ फोटोमध्ये दिसावी. उदा: फोन 12:10 वाजता लॉन्च झाला, तर ती वेळ प्रत्येक स्क्रीनवर असावी. त्यानुसार, iPhone सकाळी 9:41 ला लॉन्च केला गेला. त्यामुळे पहिला फोन लॉन्च केलेली वेळ प्रत्येक आयफोनच्या स्क्रीनवर दाखवली जाते.

Web Title: iphone-15-photos-and-price-in-india-know-why-all-apple-phones-display-941-reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.