शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

सुदैव... कार ४०० फूट दरीत कोसळली; पण, iPhone 14 मुळे मिळाले 'जीवदान'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 1:43 PM

आयफोन म्हणजे महागडा किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे

तंत्रज्ञान किंवा नवं संशोधनाचे फायदे आणि तोटे असतात. त्याचप्रमाणे, मोबाईल ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी क्रांती म्हणता येईल. त्यात, इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे जग अगदी जवळ आलंय. या नव तंत्रज्ञानाचा कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे. मात्र, आयफोनच्या वापरामुळे एका व्यक्तीच्या जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. आयफोनच्या नवनवीन फिचरची नेहमीच चर्चा होत असते, आता या फिचरचा अनुभवही या घटनेतून सर्वांसमोर आला आहे. 

आयफोन म्हणजे महागडा किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. तरीही, आयफोन घेण्यासाठी ग्राहक गर्दी करतानाचेही दिसून आले आहे. आता, तोच आयफोन एका व्यक्तीचा जीव वाचवण्यास कारणीभूत ठरला आहे. एका व्यक्तीच्या कारलाअपघात झाला, तब्बल 400 फूट दरीत ही कार कोसळली होती. त्यावेळी, आयफोन 14 मधील लाईफ सेव्हिंग फिचर म्हणजेच Crash Detection आणि Satelite Emergency SOS मुळे अपघात झालेल्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करण्यात मदत झाली. विशेष म्हणजे या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट किंवा संपर्क साधण्यास इतर कुठलीही सुविधा नव्हती. मात्र, आयफोन 14 मधील फिचरमुळे ते शक्य झालं. ही घटना लॉस अँजेलिस येथील आहे. दरम्यान, यापूर्वीही Apple Smartwatch मुळे एका व्यक्तीचा जीव वाचला होता, ज्यास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले. 

आयफोन 14 मधील Crash Detection फिचर अपघातानंतर लगेच ऑटोमॅटिकरित्या ऍक्टिव्ह होते. त्यामुळे, नेटवर्क नसतानाही सॅटेलाईटशी कनेक्ट होऊन लोकेशन ट्रेस केले जाते. ज्यामुळे, नेटवर्क, इंटरनेट नसेल तरीही संबंधित ठिकाण शोधून वेळेत मदत पोहोचवता येऊ शकते. 

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XAccidentअपघातcarकारAmericaअमेरिका