शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 13 and iPhone 12 price cut: आयफोन-१४ लाँच होताच भारतात आयफोन-१३ आणि आयफोन-१२ च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 10:38 IST

Apple चा बहुप्रतिक्षीत आयफोन १४ अखेर काल लॉन्च झाला. आयफोन-१४ ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे.

Apple चा बहुप्रतिक्षीत आयफोन १४ अखेर काल लॉन्च झाला. आयफोन-१४ ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे. नवीन iPhones लाँच होताच कंपनीकडून जुन्या फोनच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे. तसंच iPhone 11 चं उत्पादन बंद केलं आहे. भारतात iPhone 13 आणि iPhone 12 च्या किमतीत घट झाली आहे. 

आयफोन-१४  भारतात आयफोन-१३ च्याच किमतीत बाजारात दाखल करण्यात आला आहे. आता iPhone 13 हा एक वर्ष जुना स्मार्टफोन असल्यानं Apple ने या उपकरणाची किंमत कमी केली आहे. iPhone 13 ची किंमत आता 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 69,990 रुपये इतकी असणार आहे. इतकंच नव्हे, तर या फोनवर Flipkart Big Billion Days सेल आणि Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल इव्हेंट दरम्यान मोठी सवलत मिळवता येऊ शकते. दोन्ही सेल इव्हेंट्स पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. 

Apple iphone 14: काय बॅटरी, काय तो कॅमेरा, काय ते eSIM अन् किंमतही एकदम OK!

iPhone 13 ची मूळ किंमत 79,990 रुपये आहे, म्हणजेच ग्राहकांना 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. Apple च्या ऑनलाइन वेबसाइटवर 58,730 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे, जी इतर काही iPhones वर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंजची रक्कम फोनची स्थिती आणि वापराच्या आधारावर मोजली जाते. दुसरीकडे, फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 17,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

iPhone 12 च्या किंमतीतही भारतात कपात झाली आहे आणि या डिव्हाइसची किंमत आता 59,990 रुपयांपासून सुरू होत आहे.  Amazon वर 64GB iPhone 12 फक्त 52,999 रुपयांना विकत घेता येणार आहे. Amazon वर ग्राहकांना 10,950 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. iPhone 12 mini ची किंमत 55,999 रुपये इतकी असेल.

तुफान! Apple नं लॅान्च केलं Ultra Watch; वादळ असो वा हाडं गोठवणारी थंडी ‘रुकेगा नै’

या वर्षी, Apple ने आयफोन-१४ चं मिनी व्हर्जन लॉन्च केलेलं नाही आणि नवीन iPhone 14 Plus मॉडेल सादर केला आहे. Apple ने खूप पूर्वी प्लस मॉडेल्सची विक्री थांबवली होती आणि ती परत आणून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११