Apple Watch Ultra: तुफान! Apple नं लॅान्च केलं Ultra Watch; वादळ असो वा हाडं गोठवणारी थंडी ‘रुकेगा नै’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:35 PM2022-09-07T23:35:44+5:302022-09-07T23:36:23+5:30

Apple Event : अ‍ॅपलनं बुधवारी इतिहासात पहिल्यांदाच अ‍ॅपल वॉच अल्ट्रा (Apple Watch Ultra) लाँच केलं.

apple watch ultra first time in history specs apple watch series 8 price features release date apple event live | Apple Watch Ultra: तुफान! Apple नं लॅान्च केलं Ultra Watch; वादळ असो वा हाडं गोठवणारी थंडी ‘रुकेगा नै’

Apple Watch Ultra: तुफान! Apple नं लॅान्च केलं Ultra Watch; वादळ असो वा हाडं गोठवणारी थंडी ‘रुकेगा नै’

Next

अ‍ॅपलनं बुधवारी इतिहासात पहिल्यांदाच अ‍ॅपल वॉच अल्ट्रा (Apple Watch Ultra) लाँच केले. वादळ असो किंवा हाडं गोठवणारी थंडी असो हे अ‍ॅपल वॉच त्याचा सहज सामना करू शकतं असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. याला रगेड लूक देण्यात आला असून अ‍ॅपल वॉच अल्ट्रा रफ अँड टफही असेल.

अ‍ॅपल वॉच अल्ट्रा कोणत्याही कंडिशनमध्ये काम करू शकेल. हार्श कंडिशनसाठी अल्ट्राची बॉडी टफन करण्यात आली आहे. यामध्ये मेटलचा अधिक वापर करण्यात आला असून ते पूर्णपणे स्विम प्रुफ असेल. याशिवाय यामध्ये वे फाईंडर फीचरही मइळणार आहे. Garmin यापूर्वी अशाप्रकारच्या हार्श कंडिशनसाठी घड्याळं लाँच करत होती. याशिवाय कंपनीनं Apple Watch SE लाँच केलं आहे. विशेष करून हे मुलांसाठी असेल. यामध्ये मुलांना ध्यानात घेऊन फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्येही क्रॅश डिटेक्शन फीचर देण्यात आलं आहे. कंपनीनं Apple Watch Series 8 मध्येही हे फीचर दिलंय. परंतु त्यातील काही फीचर्स यात देण्यात आलेली नाहीत.

AppleWatchSeries 8 लाँच

Apple Watch Series 8 सीरिजच्या डिझाईनमध्ये कंपनीनं कोणताही बदल केलेला नाही. परंतु यात काही नवे फीचर्स देण्यात आलेत. यात ईसीजीपासून फॅमिली प्लॅनिंगपर्यंत फीचर्स मिळतील. कार क्रॅश डिटेक्शनसाठी यामध्ये कंपनीनं अनेक सेन्सर्सचा वापर केला आहे. यापूर्वीही यासाठी अनेक गॅजेट्स आले होते. परंतु पहिल्यांदाच स्मार्टवॉचमध्ये याचा वापर करण्यात आलाय.

Apple Watch Series 8 मध्ये १८ तासांची बॅटरी लाईफ मिळणार आहे, यावेळी ट्रेम्प्रेचर मॉनिटरमुळे लवकर बॅटरी उतरेल. त्यामुळेच कंपनीनं यात पॉवर मोड दिला आहे. सेल्युलर मॉडेलमध्ये इंटरनॅशनल रोमिंगचंही फीचर देण्यात आलंय. जीपीएसवाल्या वॉचची किंमत ३९९ डॉलर्स तर जीपीएस + सेल्युलरवाल्या मॉडेलची किंमत ४९९ डॉलर्स असेल. तर अॅपल वॉच अल्ट्राची किंमत ७९९ डॉलर्स असेल. तरंच विक्रीसाठी हे स्मार्टवॉच २३ सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.

Web Title: apple watch ultra first time in history specs apple watch series 8 price features release date apple event live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल