Instagram : इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; बदलणार तुमचं प्रोफाइल डिझाईन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 14:26 IST2018-11-24T13:40:29+5:302018-11-24T14:26:39+5:30
सोशल मीडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Instagram : इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; बदलणार तुमचं प्रोफाइल डिझाईन!
मुंबई - सोशल मीडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. इन्स्टाग्राममध्ये प्रोफाइल, फीचर, आयकॉन्स आणि बटण अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. या संदर्भात चाचणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या नव्या फिचर्सच्या मदतीने युजर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चांगल्या पद्धतीने कनेक्ट होणार आहेत.
इन्स्टाग्राम युजर्सच्या प्रोफाईल कंटेंटमध्ये कोणातही बदल होणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मात्र नवीन फीचर अॅड झाल्यानंतर फॉलो आणि मेसेजचं बटण बाजूबाजूला येणार आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्याही प्रोफाइलवर टॅप करू तेव्हा आपल्याला म्यूच्युअल फॉलोअर्स दिसणार आहेत. युजर्संना इन्स्टाग्रामचा वापर करणं अधिक सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं कंपनीने म्हटले आहे.
इन्स्टाग्राम रीडिझाईनमध्ये काही खास बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये फॉलोअर्स काऊंट आधीच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने दिसणार आहेत. गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामने युजर्स अॅपवर किती वेळ घालवतात हे सांगणार नवं फीचर आणलं होतं. तसेच कंपनीने फेक फॉलोअर्स आणि स्पॅमर्सला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इन्स्टाग्रामसोबतच ट्वीटरनेही काही दिवसांपूर्वी आपल्या iOS अॅपमध्ये अशाच प्रकारचे काही बदल केले आहेत.