गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:17 IST2026-04-11T17:17:03+5:302026-04-11T17:17:55+5:30
Comment Editing Feature : इन्स्टाग्रामने एका अशा दमदार फीचरची घोषणा केली आहे ज्याची युजर्स अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्सना त्यांची कमेंट पोस्ट केल्यानंतरही ती 'एडिट' करता येणार आहे.

गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
इन्स्टाग्रामने अखेर एका अशा दमदार फीचरची घोषणा केली आहे ज्याची युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्सना त्यांची कमेंट पोस्ट केल्यानंतरही ती 'एडिट' करता येणार आहे. बऱ्याचदा एखाद्या पोस्टवर चुकून चुकीची कमेंट टाइप होते. इन्स्टाग्रामच्या या नवीन फीचरमुळे अशा चुका सुधारणं अधिक सोपं होणार आहे. यामध्ये युजर्स 'स्पेलिंग मिस्टेक' किंवा इतर कोणत्याही चुका दुरुस्त करू शकतील.
इन्स्टाग्रामने जारी केलेलं हे फीचर केवळ १५ मिनिटांसाठी असेल. म्हणजेच, कमेंट केल्यानंतर १५ मिनिटांच्या आतच युजर्सना ती एडिट करता येईल. इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर ट्रान्सपरन्सी टिकवून ठेवण्यासाठी 'एडिट' टॅगचा वापर करणार आहे. जर एखाद्या युजरने आपली कमेंट एडिट केली, तर इतर लोकांना तिथे कमेंट एडिट केल्याचं दिसेल.
कमेंट अपडेट करण्यासाठीचे नियम
- कमेंट एडिट करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ असेल.
- या १५ मिनिटांत युजर कितीही वेळा कमेंट एडिट करू शकतो.
- एडिट करण्याची सुविधा केवळ 'टेक्स्ट' साठी लागू आहे.
- जर कमेंटमध्ये फोटो किंवा इतर काही असेल, तर ते एडिट करता येणार नाही.
- एडिट केलेल्या कमेंटवर 'Edited' असा टॅग दिसेल.
कमेंट एडिट कशी करावी?
इन्स्टाग्राम पोस्टवर केलेली कमेंट एडिट करणं अतिशय सोपं आहे. यासाठी युजरला आपल्या कमेंटवर थोडा वेळ टॅप करून ठेवावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील, ज्यामध्ये 'एडिट'चा (Edit) पर्याय निवडावा लागेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची चुकीची कमेंट सुधारू शकता. एकदा कमेंट एडिट झाली की त्यावर 'Edited' टॅग दिसेल. महत्त्वाचे म्हणजे कमेंट एडिट केल्यानंतर कोणताही युजर तुमची जुनी कमेंट पाहू शकणार नाही.