11GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये ढासू Infinix Note 11S लाँच; 50MP रियर कॅमेरा आणि 5,000mAh बाजारात उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: November 8, 2021 05:50 PM2021-11-08T17:50:42+5:302021-11-08T17:50:54+5:30

Budget Phone Infinix Note 11S: Infinix Note 11S हा स्मार्टफोन कंपनीने थायलंडमध्ये सादर केला आहे. हा फोन 120Hz Refresh Rate, 50MP Camera, 33W Fast Charging आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.

Infinix note 11s smartphone launched with 50mp camera and helio g96 chipset  | 11GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये ढासू Infinix Note 11S लाँच; 50MP रियर कॅमेरा आणि 5,000mAh बाजारात उपलब्ध 

11GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये ढासू Infinix Note 11S लाँच; 50MP रियर कॅमेरा आणि 5,000mAh बाजारात उपलब्ध 

Next

काही दिवसांपूर्वी Infinix ने आपली Note 11 सीरीज सादर केली होती. या सीरिज अंतर्गत Infinite Note 11 Pro आणि Infinix Note 11 हे दोन फोन्स आधीच सादर करण्यात आले आहेत. आता यात Infinix Note 11s देखील जोडण्यात आला आहे. Infinix Note 11s स्मार्टफोन 120Hz Refresh Rate, 50MP Camera, 33W Fast Charging आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.  

Infinix Note 11S चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबोरोबर 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. या फोनमधील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येते. तसेच कंपनीने फोनमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅम देखील दिला आहे. 

या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Infinix Note 11s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळतो. Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी  33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Android 11 आधारित हा फोन XOS 10 वर चालतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. कनेक्टिविटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.2, GPS, USB C आणि 3.3 ऑडियो जॅक असे ऑप्शन्स मिळतात.  

Infinix Note 11S ची किंमत 

Infinix Note 11S स्मार्टफोन सध्या थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे हा फोन हेज ग्रीन, मिथरिल ग्रे आणि सिम्फनी स्यान कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध झाला आहे. ज्याची किंमत 6,999 THB म्हणजे सुमारे 15,600 भारतीय रुपयांपासून सुरु होते.  

Web Title: Infinix note 11s smartphone launched with 50mp camera and helio g96 chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.