गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी भारत सरकारचा इशारा; होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:36 IST2025-02-14T12:34:17+5:302025-02-14T12:36:46+5:30
भारत सरकारशी संबंधित एजन्सी CERT-In ने गुगल क्रोम वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एक इशारा जारी केला आहे.

गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी भारत सरकारचा इशारा; होऊ शकतं मोठं नुकसान
भारत सरकारने गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक इशारा दिला आहे. हा इशारा सरकारशी संबंधित एजन्सी, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. जर तुम्ही गुगल क्रोम इंटरनेट ब्राउझर वापरत असाल तर तुम्ही सावध असले पाहिजे, असं यात सांगितले आहे. हा इशारा विंडोज किंवा मॅकओएसवर या लोकप्रिय ब्राउझरचा वापर करणाऱ्यांसाठी दिला आहे.
CERT-In ने बुलेटिनमध्ये माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले की, उपकरण वापरणाऱ्या गुगल क्रोम वापरकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि कोणत्या त्रुटींमुळे ते धोक्यात आहेत. 'गुगल क्रोममधील अनेक भेद्यता एक्सटेंशन API च्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आणि स्किया, V8 मध्ये फ्रीच्या वापरामुळे होतात.' या त्रुटींचा फायदा हल्लेखोर आणि घोटाळेबाज घेऊ शकतात.
मोठं नुकसान होऊ शकतं
क्रोम ब्राउझरमधील सध्याच्या त्रुटी ब्राउझरच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना नुकसान होऊ शकते. सध्याच्या त्रुटींमुळे, रिमोट हल्लेखोर दुरून वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकतात.यासाठी डिव्हाइसवर फिजिकल एक्सेसची गरज नाही.
तुमचे डिव्हाइस खास डिझाइन केलेल्या वेबपेजचा वापर करून हॅक केले जाऊ शकते. यानंतर, तुमचा वैयक्तिक डेटा चोरणे, तुमची ओळख चोरणे आणि इतर घोटाळे करून तुमचे बँक खाते रिकामे करणे यासारख्या कारवाया देखील केल्या जाऊ शकतात.
ब्राउझर आपोआप अपडेट होतो पण तरीही एकदा तपासून तो पुन्हा अपडेट करुन घ्या. जर तुमच्या ब्राउझरला अपडेट मिळाले नसेल, तर तुम्हाला दुरुस्तीसाठी वाट पहावी लागेल. Linux वर 133.0.6943.53 पेक्षा जुने आणि Windows किंवा Mac वर 133.0.6943.53/54 पेक्षा जुने Chrome व्हर्जन रिस्कच्या श्रेणीत येतात.