AI च्या शर्यतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला; UK अन् साउथ कोरियाला मागे टाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:30 IST2025-12-16T13:29:49+5:302025-12-16T13:30:07+5:30
मागील वर्षी भारत याच यादीत सातव्या स्थानावर होता.

AI च्या शर्यतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला; UK अन् साउथ कोरियाला मागे टाकले
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात भारताने अभूतपूर्व कामगिरी करत जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘2025 Global AI Vibrancy Tool’ रिपोर्टमध्ये (2024 च्या डेटावर आधारित) भारताने थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी भारत या यादीत सातव्या स्थानावर होता. या रँकिंगमध्ये भारताचा 21.59 स्कोअर असून, भारतापेक्षा पुढे केवळ अमेरिका (78.6) आणि चीन (36.95) हे दोन देश आहेत.
काय आहे स्टॅनफोर्डचा ‘ग्लोबल AI वाइब्रेंसी टूल’?
हा एक ऑनलाइन डॅशबोर्ड असून, जगभरातील देशांची AI क्षेत्रातील सक्रियता आणि स्पर्धात्मकता यांच्या आधारे रँकिंग करतो. या टूलमध्ये देशांचे मूल्यमापन खालील 7 स्तंभांवर केले जाते:
- संशोधन
- टॅलेंट
- अर्थव्यवस्था
- धोरण
- पायाभूत सुविधा
- जबाबदार AI
- जनमत
याच निकषांवर भारताने मोठी झेप घेत दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांना मागे टाकले आहे.
अवघ्या एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर कसा पोहोचला भारत?
रिपोर्टनुसार, भारताच्या प्रगतीमागे काही महत्त्वाची कारणे आहेत:
- मजबूत सरकारी धोरणे
- वेगाने वाढणारे स्टार्टअप इकोसिस्टम
- AI तज्ज्ञांचा मोठा टॅलेंट पूल
स्टॅनफोर्ड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, AI क्षेत्रातील नव्या आणि मोठ्या उपक्रमांचा भारताला थेट फायदा झाला असून, त्यामुळे अनेक विकसित देशांना मागे टाकणे शक्य झाले आहे.
स्टार्टअप्स आणि प्रायव्हेट सेक्टरचा किती वाटा?
भारताची AI वा/ब्रेंसी ही मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स आणि एंटरप्राइजेसच्या वाढीशी जोडलेली आहे. फायनान्स, हेल्थकेअर, एज्युकेशन, लॉजिस्टिक्ससारख्या विविध क्षेत्रांत AI चा वापर आणि मोठा डिजिटल मार्केट आणि सक्रिय कंपन्या, यामुळे भारत उभरत्या बाजारांमध्ये सर्वाधिक स्पर्धात्मक AI इकॉनॉमींपैकी एक ठरत आहे.
भारताचा ‘टॅलेंट अॅडव्हान्टेज’
भारत आज जागतिक AI टॅलेंट पॉवरहाउस म्हणून ओळखला जात आहे. AI हायरिंगमध्ये जगात सर्वाधिक Year-on-Year Growth, 2024 मध्ये AI संबंधित GitHub प्रोजेक्ट्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचे योगदान आणि AI स्किल पेनिट्रेशनमध्ये भारत टॉप देशांमध्ये, हे भारताच्या मजबूत इंजिनिअरिंग वर्कफोर्सचे स्पष्ट प्रतिबिंब आहेत.
AI रिसर्च आणि इनोवेशनमध्ये भारत किती मजबूत?
अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत अद्याप मागे असला, तरी AI पब्लिकेशन, पेटंट फायलिंग या दोन्ही क्षेत्रांत भारताची प्रगती स्पष्ट दिसून येते. स्टॅनफोर्डच्या AI इंडेक्सनुसार भारत सतत आपली AI आउटपुट क्षमता वाढवत असून, स्वतःला एक स्ट्रॅटेजिक AI डेव्हलपमेंट हब म्हणून उभे करत आहे. विशेषतः अकॅडमिक आणि इंडस्ट्रीमधील वाढते सहकार्य भारताला बळकटी देत आहे.
सरकारची भूमिका काय?
भारताच्या AI यशामागे IndiaAI Mission ही महत्त्वाची योजना ठरली आहे. पुढील 5 वर्षांसाठी ₹10,300-10,372 कोटींचा बजेट, 10,000 हून अधिक GPUs द्वारे कम्प्युटिंग क्षमतेत वाढ, नॅशनल नॉन-पर्सनल डेटा प्लॅटफॉर्मची उभारणी आणि सुरक्षित आणि विश्वासार्ह AI साठी फ्रेमवर्क, याचा थेट परिणाम पॉलिसी, गव्हर्नन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या स्तंभांवर झाला आहे.
भारत कुठे मागे आहे?
विश्लेषकांच्या मते, काही आव्हाने अजूनही कायम आहेत. कटिंग-एज AI रिसर्च, जागतिक स्तरावर ओळखले जाणारे फाउंडेशनल मॉडेल्स, अमेरिका आणि चीनच्या तुलनेत हाय-वॅल्यू प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि डेटा क्वालिटी आणि अॅडव्हान्स R&D क्षमतेतील अडथळे. याशिवाय, प्रमुख शहरी केंद्रांपलीकडे Responsible AI रेग्युलेशन आणि अॅक्सेस वाढवण्याची गरज आहे.