शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

फॅबलेटच्या लोकप्रियतेत वाढ

By शेखर पाटील | Published: December 05, 2017 3:16 PM

मोठ्या आकारमानाचे स्मार्टफोन अर्थात फॅबलेटच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा सरळ फटका लहान डिस्प्ले असणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटला बसणार असल्याचे ताज्या आकडेवारीतून दर्शविण्यात आले आहे.

मोठ्या आकारमानाचे स्मार्टफोन अर्थात फॅबलेटच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा सरळ फटका लहान डिस्प्ले असणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटला बसणार असल्याचे ताज्या आकडेवारीतून दर्शविण्यात आले आहे.सध्या साधारणपणे ५.५ इंच आकारमानापेक्षा मोठा डिस्प्ले असणार्‍या स्मार्टफोनला फॅबलेट म्हटले जाते. याच्या आतील वर्गवारी स्मार्टफोन तर ७ इंच वा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असणारी उपकरणे टॅबलेट या प्रकारात येतात. म्हणजेच ५.५ ते ७ इंच आकारमानाच्या डिस्प्लेयुक्त उपकरणे फॅबलेट या वर्गवारीत येतात. या अनुषंगाने इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसीच्या ताज्या आकडेवारीतून समोर आलेली माहिती नाविन्यपूर्ण आणि स्मार्ट उपकरणांच्या लोकप्रियतेतील बदल दर्शविणारी आहे. या अहवालानुसार २०१७च्या अखेरपर्यंत वर्षभरात १५० कोटी स्मार्टफोनची विक्री अपेक्षित असून यापैकी ६१.१ कोटी म्हणजेच सुमारे ४० टक्के इतका वाटा फॅबलेटचा असेल.जगात सध्या स्मार्टफोनची लोकप्रियता अबाधित असली तरी याची ग्रोथ थोडीफार मंदावली आहे. याचा विचार करता दरवर्षी सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह २०२१च्या अखेरीस जगात वर्षाला १७० कोटी स्मार्टफोन विकले जातील. तर यातील तब्बल १०० कोटी स्मार्टफोन्स हे फॅबलेट या प्रकारातील असतील असा अंदाज आयडीसीच्या या अहवालात वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच येत्या चार वर्षात फॅबलेटची विक्री ही लहान डिस्प्लेच्या स्मार्टफोनपेक्षा जास्त असेल. एकीकडे फॅबलेटच्या विक्रीत वाढ होत असतांना टॅबलेटलाही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता गत तिमाहीचा अपवाद वगळता टॅबलेटची विक्री थोडी मंदावल्याचे दिसून येत आहे.फॅबलेटच्या विक्रीत प्रारंभी सॅमसंगचा मोठा वाटा होता. मात्र अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी जोरदार मुसंडी मारल्यामुळे सॅमसंगची या क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. ऑपरेटींग सिस्टीमचा विचार केला असता अँड्रॉइडवर चालणारे फॅबलेट सर्वाधीक प्रमाणात विकले जात आहेत. तर दुसरीकडे अ‍ॅपललाही फॅबलेटची महत्ता कळल्याचे दिसून येत आहे. प्रारंभीचे आयफोन मॉडेल्स हे लहान डिस्प्लेंचे असत. मात्र अलीकडच्या काळात लाँच झालेल्या आयफोनचे डिस्प्ले हे आकारमानाने मोठे असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे. हाच ट्रेंड येत्या कालखंडात कायम राहणार असून अर्थातच फॅबलेटच्या विक्रीत वाढ होणार असल्याचे आयडीसीने स्पष्टपणे नमूद केले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान