शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:04 IST

देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात.

नवी दिल्ली : एखादे ठिकाण शोधायला किंवा रस्ता दाखविण्याचे काम गुगल मॅप चांगल्या पद्धतीने करतो. वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक, शहरात फ्लायओव्हरवर जायचे की सर्व्हिस रोडने जायचे याचे मार्गदर्शन केल्याने नवख्या व्यक्तीलाही वाहन मार्गक्रमण करणे सोपे जाते. आता आणखी एक महत्वाचे फिचर गुगल मॅपमध्ये येणार आहे. ते म्हणजे Speed Limits. 

देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. यापेक्षा महत्वाचे म्हणजे टायर फुटणे, वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. भारतीय रस्ते हे जास्तीतजास्त 80 किमीच्या वेगाने जाण्यासाठी बनविलेले असतात. मात्र, सध्याची वाहने ही 120 ते 180 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकतात. यावर आळा घालण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी गुगलने हे फिचर आणले आहे. Google Maps च्या आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे फिचर लाँच होणार आहे. हे फिचर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांबरोबरच दृतगती महामार्गांवरही उपयोगाचे ठरणार आहे. गुगल मॅपवर उजव्या बाजुला खाली हे फिचर दिसणार आहे. यावर वाहन चालविणाऱ्याला त्या रस्त्याची स्पीड लिमिट किती आहे याची माहिती मिळेल. 

एका माहितीनुसार हे Speed Limits फिचर भारतासाठी नसून अमेरिका, युरोप आणि डेन्मार्कसाठी उपलब्ध होणार आहे. तर भारतासाठी Speed Camera हे फिचर देण्यात येणार आहे. या फिचरमध्ये ज्या ठिकाणी स्पीड कॅमेरा असेल त्याच्या जवळ आल्यावर वाहनचालकाला सावध केले जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडून वेगाने वाहने चालविणाऱ्यांच्या वाहनाचा फोटो काढून दंडाची नोटीस पाठविली जाते. हा दंड टाळण्यासाठी Google Maps चे हे Speed Camera हे फिचर उपयोगाचे ठरणार आहे. 

अ‍ॅप अपडेट करायची गरज नाही....स्पीड कॅमेरा जवळ आल्यावर गुगल वाहनचालकाला आवाजाद्वारे सावध करेल. यामुळे वाहनाचा वेग कधी कमी करावा याची माहिती मिळेल. या फिचरसाठी अ‍ॅप अपडेट करण्याची गरज राहणार नाही. हे फिचर सर्व्हर साईडवरच अपलोड केले जाणार आहे. हे फिचर लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. 

टॅग्स :googleगुगलhighwayमहामार्गtraffic policeवाहतूक पोलीस