शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

TikTok डाऊनलोडसाठी तुम्हालाही 'हा' मेसेज आला असेल तर राहा सावध, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 16:07 IST

या एसएमएसमध्ये टिकटॉक प्रो नावाच्या एपीके (apk) फाइलची लिंक आहे.

ठळक मुद्देबऱ्याच लोकांना एक संशयास्पद एसएमएस मिळाला आहे. ज्यामध्ये  टिकटॉक भारतात पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे.

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप टिकटॉकवर (TikTok ) भारतात बंदी घातली आहे. सरकारने या चिनी अॅपवर बंदी घातली आहे, परंतु लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या व्हर्जनमधून मेसेजस् येत आहेत. खरंतर,  बऱ्याच लोकांना एक संशयास्पद एसएमएस मिळाला आहे. ज्यामध्ये  टिकटॉक भारतात पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे.

या एसएमएसमध्ये टिकटॉक प्रो नावाच्या एपीके (apk) फाइलची लिंक आहे. त्यामुळे टिकटॉक हवे असणारे बरेच  लोक ते आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करीत आहेत. मात्र, असे केल्याने तुमचा फोन आणि खासगी डेटासाठी धोकादायक ठरू शकतो. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, "टिकटॉक भारतात पुन्हा आले आहे. नवीन फीचर्ससह आता क्रिएटिव्ह व्हिडिओ पुन्हा तयार केला जाऊ शकतात. खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा नवीन (TikTok v1). या मेसेजसोबत एक लिंक देखील देण्यात आली आहे, जी एपीके फाइलची आहे. या लिंकवरर क्लिक केल्याने एपीके अ‍ॅपचे स्टोअर उघडले जाते. ज्यामधून युजर्स खरे टिकटॉक समजून डाऊनलोड करीत आहेत.

बहुतेक प्रकरणांमध्ये लिंक उघडल्यानंतर फोन अज्ञात अ‍ॅप इंस्टॉल करण्याची परवानगी विचारते. यानंतर, जेव्हा युजर सेटिंगमध्ये जाऊन परवानगी ऑन करतो, तेव्हा त्याला इंस्टॉल करण्याचा ऑप्शन मिळतो आणि अॅप सहजपणे फोनमध्ये काम करण्यास सुरवात करते. जे लोक एपीके फाइल डाऊनलोड करून अॅप चालवित आहेत. त्यांना ते किती मोठा धोका पत्करीत आहेत, हे माहीत नाही. ज्यावेळी एखादी फाइल अधिकृतपणे उपलब्ध नसते आणि आपण त्याची एपीके फाइल वापरत असाल, त्यावेळी त्यात काय बदल केले गेले आहेत, हे आपल्याला सापडत नाही. याचा अर्थ असा की ते सहजपणे आपल्या फोनमध्ये मालवेयर, स्पायवेअर येऊ शकते. त्यानंतर आपला खाजगी डेटा एपीके फाइल डेव्हलपर्सकडे ट्रान्सफर केली जाऊ शकते.

इतकेच नाही तर तुम्ही हे देखील लक्षात घेतले असेल की, ज्यावेळी नवीन अ‍ॅप डाउनलोड करतो. त्यावेळी अ‍ॅप camera, audio, gallery, contacts, location यासारख्या पर्यायांसह बर्‍याच गोष्टींकडून परवानगी घेते. त्यामुळे तुम्ही या परवानगीला Allow केले तर तुम्ही कोठे जात आहात, कोणाशी आपण बोलत आहात, हे डेव्हलपर्सला कळू शकते. म्हणजेच, डेव्हलपर्सला फोनचा पूर्ण एक्सेस मिळू शकतो.

आणखी बातम्या...

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकtechnologyतंत्रज्ञान