Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:10 IST2025-10-28T10:09:36+5:302025-10-28T10:10:45+5:30
Auto Pay Cancel process in Marathi: न्यूज पेपर, एसआयपी, अमेझॉन, नेटफ्लिक्स सारखे सबस्क्रीप्शन अशासाठी हे ऑटोपे फीचर वापरले जाते. अनेकदा तुम्ही विसरूनही जाता आणि ईएमआय जायची वेळ आलेली असते तेव्हा ते अचानक पैसे कापते आणि अडचणीत टाकते.

Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे...
आजकाल बहुतांश नागरिक पेमेंटसाठी युपीआयचा वापर करतात. पण, याच UPI मध्ये एक अत्यंत सोयीचा वाटणारे, पण आर्थिक फटका देऊ शकणारे 'ऑटोपे' नावाचे फीचर आहे. एखादे सबस्क्रिप्शन घेताना ते सुरु होते आणि मग अचानक ती तारीख आली की पैसे कट होतात अन मोठा फटका बसतो.
यामध्ये न्यूज पेपर, एसआयपी, अमेझॉन, नेटफ्लिक्स सारखे सबस्क्रीप्शन अशासाठी हे ऑटोपे फीचर वापरले जाते. अनेकदा तुम्ही विसरूनही जाता आणि ईएमआय जायची वेळ आलेली असते तेव्हा ते अचानक पैसे कापते आणि अडचणीत टाकते. ही ऑटो पे सिस्टीम बंद करण्याचा देखील या अॅपमध्ये पर्याय असतो. Paytm, PhonePe आणि Google Pay या प्रमुख ॲप्सवर हे ऑटोपेमेंट कसे थांबवायचे, याची सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
Google Pay वर AutoPay कसे थांबवाल?
Google Pay ॲप उघडा आणि प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. 'Recurring Payments' (आवर्ती पेमेंट) किंवा 'AutoPay' पर्याय शोधा आणि त्यावर टॅप करा. तुम्हाला कॅन्सल करायचा असलेला मॅन्डेट निवडा. पुढील स्क्रीनवर 'Cancel Mandate' पर्यायावर क्लिक करा. तुमचा UPI PIN टाकून ही प्रक्रिया पूर्ण करा.
PhonePe वर AutoPay कसा कॅन्सल कराल?
PhonePe ॲप उघडा आणि तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. 'UPI AutoPay' किंवा 'Mandates' (मॅन्डेट्स) या पर्यायावर जा. तुमचे ॲक्टिव्ह असलेले मॅन्डेट्स तिथे दिसतील, त्यापैकी रद्द करायचे असलेले मॅन्डेट निवडा. रद्द करण्यासाठी 'Remove/Cancel' पर्यायावर टॅप करा आणि UPI PIN टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
Paytm वर AutoPay कॅन्सल करण्याची पद्धत:
Paytm ॲप उघडून 'UPI & Money Transfer' विभागात जा. 'UPI AutoPay' किंवा 'Manage AutoPay' या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला रद्द करायचे असलेले ॲक्टिव्ह मॅन्डेट निवडा. 'Cancel AutoPay' बटणावर क्लिक करा आणि UPI पिन टाकून कन्फर्म करा.