शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:39 IST

तरुणींना नव्या ट्रेंडने भूरळ घातली आहे. सॉफ्ट लायटिंग आणि सुंदर साडीतल्या मुलींचे फोटो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत.

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगणं खूप कठीण आहे. काही दिवसांपूर्वी घिबली स्टाईलचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते, त्यानंतर आता लोक त्यांचे ३डी रिएलिस्टिक मॉडेल्स इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. हा ट्रेंड अजून संपला नव्हता तोच सोशल मीडियावर आणखी एक नवीन ट्रेंड तुफान व्हायरल झाला. आता विंटेज साडी आणि ओल्ड स्कूल सिनेमाच्या व्हाइब्ससह नवीन साडी लूक खूप ट्रेंडिंग आहे. या ट्रेंडमध्ये लोक गुगलच्या मदतीने त्यांचे साधे फोटो पोर्ट्रेटमध्ये बदलत आहेत जे क्लासिक चित्रपटातील सीनसारखे दिसतात.

इन्स्टाग्रामवर सर्वच जण हा ट्रेंड फॉलो करत आहेत. सोशल मीडिया उघडताच हेच फोटो सर्वप्रथम दिसतात. तरुणींना नव्या ट्रेंडने भूरळ घातली आहे. सॉफ्ट लायटिंग आणि सुंदर साडीतल्या मुलींचे फोटो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये ९० च्या दशकातील चित्रपटांचा गोल्डन एरा आणि पिंटरेस्ट स्टाईलच्या रेट्रो फॅशनची झलक पाहायला मिळत आहे. जर तुम्हालाही या लेटेस्ट ट्रेंडमध्ये सामील व्हायचं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचा विंटेज साडीतील फोटो  तयार करू शकता...

विंटेज साडीमधला फोटो कसा तयार करायचा?

- सर्वप्रथम Gemini App डाउनलोड करा.

- आता तुमच्या गुगल अकाउंटने  लॉग इन करा.

- यानंतर तुम्हाला हवा असलेला फोटो अपलोड करा.

- खाली दिलेला सँपल प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा.

Create a hyper-realistic 4K portrait of the same young Indian woman as in the reference photo (no face changes). She has long, dark, wavy hair falling over her shoulders with fresh white jasmine flowers tucked behind her right ear. She is wearing a soft, elegant red chiffon saree draped gracefully over one shoulder, revealing a vintage-style blouse underneath. Her expression is gentle and dreamy as she gazes slightly to her right. The background is a plain warm beige wall lit by a golden light from the right side, casting a soft cinematic shadow. The overall atmosphere should feel like a 90s Indian classic film still — artistic, romantic, and timeless.

- तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही  नवीन प्रॉम्प्ट देखील लिहू शकता.

- यानंतर सेंड बटण दाबा आणि जेमिनी इमेज जनरेट होईपर्यंत वाट पाहा.

- फोटो झाला की तुम्ही तो सहजपणे डाउनलोड करू शकता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान