५ ते १० हजार रुपये दररोज कमवा, जॉबसोबतच अशी करा अधिकची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 09:24 IST2022-05-19T09:23:40+5:302022-05-19T09:24:21+5:30
जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचे उत्पन्न थोडं वाढवायचं असेल जेणेकरून तुम्ही तुमचं घर अधिक सहजतेनं चालवू शकता

५ ते १० हजार रुपये दररोज कमवा, जॉबसोबतच अशी करा अधिकची कमाई!
नवी दिल्ली-
जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचे उत्पन्न थोडं वाढवायचं असेल जेणेकरून तुम्ही तुमचं घर अधिक सहजतेनं चालवू शकता, तर त्यासाठी तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. दरमहा हजारो रुपये कमवू शकता. कसे ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर सोशल मीडिया हे एकमेव व्यासपीठ आहे जे तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतं. पण इथं कंटेंटच सर्व काही आहे. तुमच्या कंटेंटमध्ये ताकद असेल तर काही महिन्यांच्या मेहनतीनं तुम्ही चांगली कमाई करू शकता. महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
काय आहे सोशल मीडियावर कमाईचा फंडा
जर तुम्हाला अजूनही सोशल मीडियावरुन पैसे कसे कमवायचे हे माहित नसेल तर तुम्हाला सर्वात आधी रील्स बद्दल माहित असलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून पैसे कमवण्यात रिल्स महत्वाची भूमिका बजावतात. परंतु तुम्हाला या बाबतीतही बरीच खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळू शकतं.
रिल्सवर कोणता कंटेंट ठरतो दमदार
लोक अनेक प्रकारचे व्हिडीओ रीलवर टाकून चांगली कमाई करत असले तरी कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर लाइफस्टाइल आणि फूड कॅटेगरीला सर्वाधिक मागणी आहे. या दोन्ही कॅटेगरी युजर्सना खूप आवडतात आणि ज्यांना कमाई करायची आहे त्यांनी जर या दोन कॅटेगरीवर चांगला व्हिडिओ कंटेंट दिला तर सोशल मीडिया रील्सवर चांगली कमाई केली जाऊ शकते. तुमचे व्हिडिओ मॉनिटाइज झाले तर दर महिन्याला पैसे मिळण्यास सुरुवात होते.