QR कोड खरा की खोटा... पेमेंट करण्यापूर्वीच कसं ओळखायचं? स्कॅमर्सपासून वाचण्याचा सोपा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:24 IST2026-03-11T16:23:35+5:302026-03-11T16:24:16+5:30

आजकाल अनेकजण खोटा QR कोड लावून लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काही टिप्स नक्की फॉलो करा.

how to check original qr code fake or real qr code qr safety guidelines | QR कोड खरा की खोटा... पेमेंट करण्यापूर्वीच कसं ओळखायचं? स्कॅमर्सपासून वाचण्याचा सोपा मंत्र

QR कोड खरा की खोटा... पेमेंट करण्यापूर्वीच कसं ओळखायचं? स्कॅमर्सपासून वाचण्याचा सोपा मंत्र

आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती डिजिटल पेमेंटला पसंती देतो. मग एखादं चॉकलेट घ्यायचं असो किंवा घरातील सामान, पेमेंट करण्यासाठी आपण लगेच फोन पुढे करतो. पण तुम्हाला माहित आहे का? QR कोड स्कॅन करणं जितकं सोपं वाटतं, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं.

आजकाल अनेकजण खोटा QR कोड लावून लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काही टिप्स नक्की फॉलो करा.

खोटा QR कोड कसा ओळखावा?

स्टिकर किंवा कागद तपासा

अनेकदा फसवणूक करणारे लोक मूळ QR कोडवर स्वतःचा दुसरा QR कोड चिकटवतात. ज्यामुळे तुम्ही पाठवलेले पैसे दुकानदाराऐवजी थेट स्कॅमरच्या खात्यात जातात. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी QR कोडवर दुसरा कागद किंवा स्टिकर चिकटवलेला नाही ना, याची खात्री करा.

नाव तपासूनच पेमेंट करा

ऑनलाइन पेमेंट करताना स्क्रीनवर ज्या व्यक्तीला किंवा दुकानाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचं नाव दिसतं. जर तिथे भलत्याच कोणाचं नाव दिसत असेल, तर पेमेंट करू नका. नाव तपासून घेतल्यास तुम्ही ऑनलाइन स्कॅमपासून वाचू शकता.

घाई करू नका

अनेकजण घाईघाईत QR कोड स्कॅन करून लगेच 'पे' बटण दाबतात. तुमची हीच घाई सायबर गुन्हेगारांना संधी देतं. त्यामुळे शांतपणे सर्व माहिती तपासून मगच पैसे पाठवा. तुमची छोटीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.
 

Web Title : QR कोड से भुगतान से पहले जांचें: धोखाधड़ी से बचने के आसान तरीके

Web Summary : डिजिटल भुगतान सुविधाजनक है, लेकिन QR कोड घोटाले बढ़ रहे हैं। स्टिकर की जांच करें, प्राप्तकर्ता का नाम सत्यापित करें, और जल्दबाजी से बचें। ये सरल कदम धोखाधड़ी से बड़े वित्तीय नुकसान को रोक सकते हैं।

Web Title : Verify QR Code Before Payment: Easy Ways to Avoid Scams

Web Summary : Digital payments are convenient, but QR code scams are rising. Check for sticker overlays, verify the recipient's name, and avoid rushing. These simple steps can prevent significant financial loss from fraud.