शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

स्मार्टफोनच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्याल ?

By अनिल भापकर | Published: April 04, 2019 12:26 PM

एकेकाळी टचस्क्रीन मोबाइल नको रे बाबा म्हणणारेदेखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाइल आनंदाने वापरताना दिसत आहेत. अगदी दोन-अडीच हजारांपासूनसुद्धा टचस्क्रीन मोबाइल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोबाइलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.

ठळक मुद्देएकेकाळी टचस्क्रीन मोबाइल नको रे बाबा म्हणणारेदेखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाइल आनंदाने वापरताना दिसत आहेत. अगदी दोन-अडीच हजारांपासूनसुद्धा टचस्क्रीन मोबाइल बाजारात उपलब्ध आहेत. नवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीनगार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीनगार्डमुळे टचस्क्रीनचे लाइफ वाढण्यास मदत होते.आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाइलसोबत फ्लिपकव्हर येतेच; मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाइल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही.

अनिल भापकरआजचा जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट हेसुद्धा टचस्क्रीनचे यायला लागलेत. टचस्क्रीन मोबाइल हे इतर फिजिकल किबोर्ड मोबाइलपेक्षा वापरायला सोपे आणि फास्ट असतात. हल्लीच्या विविध डिक्शनरी अँपमुळे, मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असणार्‍या डिक्शनरीमुळे टचस्क्रीनचा टायपिंग स्पीड हा जास्त असतो. त्याचप्रमाणे टचस्क्रीनमुळे स्मार्टफोनचा स्क्रीन साइजदेखील वाढली आहे. कारण पूर्वी मोबाइलचा खालचा अर्धा भाग हा  किबोर्डसाठी असायचा आता टचस्क्रीनमुळे  मोबाइलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.एकेकाळी टचस्क्रीन मोबाइल नको रे बाबा म्हणणारेदेखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाइल आनंदाने वापरताना दिसत आहेत. अगदी दोन-अडीच हजारांपासूनसुद्धा टचस्क्रीन मोबाइल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाइल वापरण्याची संख्या ही सर्वाधिक आहे.

टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी ?

१) नखाचा वापर करू नकाआपल्यापैकी अनेकांना मोबाइल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन  हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. २) हळूच टच कराअनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाइल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेसस्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो; मात्र ही मंडळी एवढय़ा जोरात टचस्क्रीन प्रेस करतात की, त्यामुळे अनेकांचे टचस्क्रीन खराबदेखील झाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीनला कधीही जोराने प्रेस करून वापरू नका. अगदी आल्हाद स्पर्श केला तरी टचस्क्रीन काम करतो.३) सूर्यकिरणांचा संपर्क टाळाटचस्क्रीन मोबाइल स्क्रीन जास्त वेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्विडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शोकतो. त्यामुळे चारचाकी गाडीमध्ये प्रवास करताना मोबाइल ज्या  दिशेने ऊन येते त्या ठिकाणी ठेऊ नका. ४) छोटा कपडा नेहमी जवळ बाळगाटचस्क्रीन व्यवस्थित काम करण्यासाठी तो स्वच्छ असणे गरजेचे असते. धूळ किंवा इतर काही कारणाने टचस्क्रीन अस्वच्छ झाला असल्यास त्याला त्वरित चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यासाठी मऊ, स्वच्छ कपडा नेहमी जवळ ठेवा, तसेच दिवसातून दोन-तीन वेळेस टचस्क्रीन साफ करण्याची सवय लावून घ्या. 5) मोबाइल कव्हर वापराटचस्क्रीन मोबाइल असेल तर अशा मोबाइलला कव्हर लावून वापरा. कारण अनेकांना मोबाइल खिशात ठेवायची सवय असते. खिशात जर आणखी काही वस्तू असतील जसे की किचन, क्वाइन त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाइलसोबत फ्लिपकव्हर येतेच; मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाइल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही.6) स्क्रीनगार्डनवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीनगार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीनगार्डमुळे टचस्क्रीनचे लाइफ वाढण्यास मदत होते.

anil.bhapkar@lokmat.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड