शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:14 IST

How To Secure Wi-Fi Router Cyber Attacks : राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं.

नवी दिल्ली - माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध स्त्रोतांकडून तक्रारी येत आहेत, ज्यामध्ये भारताबाहेरील सर्व्हरसाठी अनधिकृतपणे डेटा चोरी करुन अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारला या आरोपांबाबत सविस्तर माहिती नसली, तरी सुरक्षेबाबत विचार करायला लावणारी ही बाब आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांसाठी राऊटरच्या (Router) रुपात ही मोठी समस्या ठरू शकते.

राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राऊटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजर्सच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो. जर एखाद्याला तुमच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या नेटवर्कशी कनेक्ट असलेल्या डिव्हाईसवर प्रवेश मिळवण्यात आणि कनेक्ट होण्यास वेळ लागणार नाही.

राऊटर असं करा सुरक्षित

राऊटर सुरक्षित करता येऊ शकतं, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Settings मध्ये Network and Internet मध्ये जावं लागेल. त्यानंतर View your Network Properties त्यानंतर DNS Servers > IP Address वेब ब्राऊजरमध्ये कॉपी करावा लागेल. राऊटर सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड. हे दोन्ही पासवर्ड बदलू शकता. हा पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल, वायफाय राऊटर एक्सेस करावा लागल्यास, पासवर्डची पुन्हा गरज लागते. त्यामुळे स्ट्राँग पासवर्ड ठेवून राऊटर सुरक्षित ठेवता येऊ शकतं.

...तर पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय?; चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक

व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊया... व्हॉट्सॲपचा बॅकग्राऊंड रंग हिरवा आहे. हा रंग बदलून तो पिंक करायचे असेल तर व्हॉट्सॲप पिंक नावाची लिंक येते. हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर असल्याचा उल्लेखही या लिंकमध्ये असतो. अर्थातच ही लिंक क्लिक करण्याचा मोह वापरकर्त्याला होतो. व्हॉट्सॲप पिंक ही लिंक क्लिक केली की युजर्सचा फोन हॅक होतो. सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेज पासून अत्यंत सावध राहण गरजेचं आहे. संपूर्ण फोन हॅक होतो. तुमचे काँटॅक्ट नंबर्स, फोटो, मेसेजेस, बँक डिटेल्स हे सगळे हॅकर्सला मिळेल. युजर्सची वैयक्तिक माहिती ही हॅकर्सला मिळते आणि ते त्याच्या जाळ्यात अडकतात.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट