'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकता कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:54 PM2021-03-02T12:54:38+5:302021-03-02T13:14:15+5:30

Reliance Jio : Reliance Jio युजर्संना ही सुविधा आता मिळू शकणार आहे. जर तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल ते जवळच्या जिओ स्टोरमधून हे घेऊ शक

how to get hands on reliance jio esim know activate esim on supported devices | 'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकता कॉल

'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकता कॉल

Next

नवी दिल्ली - भारतीय मार्केटची टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी eSIM सपोर्ट उपलब्ध करत आहे. eSIM म्हणजेच इंबेडेड सब्सक्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे. जे थेट फोनमध्ये एम्बेड केले जाते. यासारखी सिम फोनमध्ये दिली गेल्यास यात फोनचे स्पेस वाचते. तसेच दोन सिम ट्रे बनवण्याची गरज नाही. हे कोणत्याही मोबाईलच्या रिमोट सिम प्रोविजनिंगला इनेबल करते. eSIM च्या युजर्सला फोनमध्ये कोणत्याही सिम कार्डशिवाय टेलिकॉम सर्व्हिस वापरता येऊ शकते. Reliance Jio युजर्संना ही सुविधा आता मिळू शकणार आहे. जर तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल ते जवळच्या जिओ स्टोरमधून हे घेऊ शकता. याबाबत अधिक जाणून घेऊया...

Jio eSIM कसं घ्याल?

जर तुम्ही Reliance Jio eSIM घेतलं तर तुम्हाला एका नवीन कनेक्शनसाठी डिजिटल किंवा जिओ स्टोरवर जावे लागेल. त्यानंतर कनेक्शन मिळवण्यासाठी आपला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागणार आहे.

Jio eSIM ला कसं कराल अ‍ॅक्टिव्हेट?

नवीन जिओ ईसिम कनेक्शनला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये एक फीचर डाऊनलोड करावे लागेल. eSIM च्या कम्पेटिबल डिव्हाईस ऑटोमेटिकली या सिमला कॉन्फ़िगर करते. चुकून तुम्ही डाऊनलोड केलेल्या ईसिमला हटवले तर तुम्हाला पुन्हा जवळच्या रिलायन्स जिओच्या डिजिटल आणि जिओच्या स्टोरवर जाऊन पुन्हा त्याला अ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल. यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागेल.

सिम कार्ड eSIM मध्ये होऊ शकतं कन्व्हर्ट

फिजिकल सिम कार्ड ईसिममध्ये बदल करू शकतो. याचे उत्तर हो असे आहे. Reliance Jio फिजिकल सिम कार्डला ज्यात जिओ कनेक्शन अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याला ईसिम ध्ये बदलू शकतो. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: how to get hands on reliance jio esim know activate esim on supported devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.