Facebook व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी वापरा ही पद्धत; थर्ड पार्टी अ‍ॅपची भासणार नाही गरज 

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 07:27 PM2021-08-11T19:27:59+5:302021-08-11T19:34:14+5:30

कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपविना अगदी सोप्प्या पद्धतीने Facebook वरून व्हिडीओ डाउनलोड करता येतो. ही ट्रिक अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइसवर वापरता येते.  

How to download facebook video on android and ios without any app  | Facebook व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी वापरा ही पद्धत; थर्ड पार्टी अ‍ॅपची भासणार नाही गरज 

Facebook व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी वापरा ही पद्धत; थर्ड पार्टी अ‍ॅपची भासणार नाही गरज 

Next
ठळक मुद्देगुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपस्टोर अनेक अ‍ॅप्स फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी मदत करतातही ट्रिक अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइसवर वापरता येते.  

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स प्रमाणे Facebook ने देखील आता व्हिडीओजना जास्त महत्व देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या फेसबुकवर अपलोड होणाऱ्या व्हीडिओजचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादा फेसबुक व्हिडीओ आवडतो किंवा महत्वाचा वाटतो. असा एखादा व्हिडीओ आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याचा थेट पर्याय फेसबुकने दिलेला नाही. परंतु फेसबुक व्हिडीओ डाउनलोड केला जाऊ शकतो त्यासाठी आम्ही पुढे Android आणि iOS दोन्ही डिवाइसवर फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगितली आहे.  

अशाप्रकारे करा Facebook व्हिडीओ डाउनलोड 

गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅपस्टोर अनेक अ‍ॅप्स फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी मदत करतात. परंतु हे अ‍ॅप्स आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर आपल्या खाजगी डेटा देखील अ‍ॅक्सेस करू शकतात. अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्सविना Facebook Video डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.  

  • सर्वप्रथम Facebook App ओपन करा. आता जो व्हिडीओ तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा.  
  • व्हिडीओच्या खाली असलेल्या Share ऑप्शनवर क्लिक करून Copy Link वर क्लिक करा आणि लिंक कॉपी करा. 
  • आता फोनमध्ये ब्राउजरमध्ये जाऊन fbdown.net ही वेबसाईट ओपन करा.  
  • वेबसाईटवरील बॉक्समध्ये लिंक पेस्ट करा आणि डाउनलोडवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवी ती क्वालिटी निवडा.  
  • त्यानंतर व्हिडीओ प्ले होईल. आता तिथे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून डाउनलोड ऑप्शन निवडा. 
  • iPhone मध्ये डाउनलोडच्या ऐवजी Save to Files ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा म्हणजे व्हिडीओ फोनमध्ये डाउनलोड होईल. 

Web Title: How to download facebook video on android and ios without any app 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.