Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ
By सिद्धेश जाधव | Updated: July 23, 2021 19:15 IST2021-07-23T19:14:22+5:302021-07-23T19:15:40+5:30
Facebook ने तुमच्या प्रोफाइलवर डिस्प्ले पिक्चरसह डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. खूप कमी लोक या ऑप्शनचा वापर करतात.

तुम्ही तुमच्या iPhone आणि Android वरून फेसबुकवर डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करू शकता
सध्या सोशल मीडियावर व्हिडीओची चलती आहे. इंस्टाग्राम सारख्या फोटो केंद्रित अॅपने देखील व्हिडीओकडे मोर्चा वळवला आहे. व्हिडीओचा ट्रेंड असताना देखील जवळपास सर्वच सोशल मीडिया साईट प्रोफाइलसाठी फक्त फोटो अपलोड करू देतात. परंतु, फेसबुकने खूप आधीपासूनच तुम्हाला प्रोफाइलवर डिस्प्ले पिक्चरसह डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. तुम्ही तुमच्या iPhone आणि Android वरून फेसबुकवर डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांच्या यादीत उठून दिसू शकता.
Facebook Android अॅपमधून अपलोड करा Profile Video
- तुमच्या अँड्रॉइड फोनवर Facebook अॅप ओपन करा
- आता वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात असलेल्या डिस्प्ले पिक्चरवर क्लिक करा
- आता तुम्ही प्रोफाइल पेजवारू पोहचाल, इथे तुमच्या डिस्प्ले पिक्चरवर क्लिक करा आणि Take New Profile Video ऑप्शन निवडा आणि व्हिडीओ शूट करा.
- जर तुम्हाला आधी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ अपलोड करायचा असेल तर डिस्प्ले पिक्चरवर क्लिक केल्यानंतर Select Profile Video चा ऑप्शन निवडा
- त्यानंतर तुम्ही व्हिडीओ एडिट करून डिस्प्ले व्हिडीओ सेट करू शकता
- व्हिडीओ एडिट करण्यासाठी ट्रिम आणि क्रॉप असे पर्याय आहेत. तुम्ही या व्हिडीओसाठी एक थंबनेल देखील निवडू शकता.
Facebook iOS अॅपमधून अपलोड करा Profile Video
- तुमच्या आयफोनवर Facebook अॅप ओपन करा
- News Feed मधील तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करून प्रोफाइल पेजवर जा
- त्यानंतर अँड्रॉइडप्रमाणे डिस्प्ले पिक्चरवर क्लिक करून New Profile Video किंवा Select Profile Video पैकी एक ऑप्शन निवडा
- व्हिडीओ शूट केल्यावर किंवा रेकॉर्डेड व्हिडीओ निवडल्यावर तो गरज असल्यास ट्रिम आणि क्रॉप करून घ्या
- त्यानंतर प्रोफाइल व्हिडीओची थंबनेल निवडा आणि Done करा