व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:13 IST2018-12-03T11:50:10+5:302018-12-03T12:13:09+5:30
व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. मात्र ही सुविधा व्हॉट्सअॅप देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत.

व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या स्टीकर्स फीचरची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. मात्र ही सुविधा व्हॉट्सअॅप देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत.
असे पाठवा व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगात मेसेज
1. व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगात मेसेज पाठवण्यासाठी सर्व प्रथम गूगल प्ले वर जाऊन WhatsBlueText हे अॅप डाऊनलोड करा.
2. अॅप ओपन केल्यानंतर त्यामधील Start Writing या पर्यायावर क्लिक करा.
व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल
3. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये Input Text हा पर्याय देण्यात आलेला आहे.
4. आपल्याला हवा असलेला मेसेज आपण यामध्ये टाईप करू शकतो. मेसेज टाईप केल्यानंतर त्यासोबत 20 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यामधील एका पर्यायावर क्लिक करा.
व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!
5. पर्यायातील पहिला पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा मेसेज निळ्या रंगात कॅपिटल लेटर्समध्ये दिसेल.
6. निळ्या रंगातील मेसेज आपण आपल्या व्हॉट्सअॅपवर शेअर करु शकतो.