शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका  

By सिद्धेश जाधव | Published: July 03, 2021 7:17 PM

DND on Jio, Airtel and Vi: या लेखात आपण Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर डू नॉट डिस्टर्ब (DND) सर्विस कशी अ‍ॅक्टिव्हेट करू शकतो, हे पहाणार आहोत.

मोबाईलचा वापर हल्ली अनेक कामांसाठी केला जातो, परंतु याचे मुख्य काम कॉल्स करणे हे आहे. कोरोनामुळे घरातून काम करताना महत्वाच्या कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. अश्यावेळी येणाऱ्या टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्सचा त्रास तर होतोच. असे कॉल्स बऱ्याचदा महत्वाच्या कामाच्या वेळीच येतात. आपण आपल्या कामाचा कॉल असेल म्हणून तो उचलतो परंतु तो स्पॅम कॉल निघतो.  

मग मनात विचार येतो कि अशी एखादी सेटिंग असेल का जी हे कॉल्स बंद करेल. अश्याच एका सर्व्हिसबाबत आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कोणतीही ट्रिक नसून सर्विस आहे जिचे नाव डू नॉट डिस्टर्ब (DND) आहे. या लेखात आपण Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर ही सर्विस कशी अ‍ॅक्टिव्हेट करू शकतो, हे पहाणार आहोत.  

रिलायन्स जियो नंबरवर असे करा DND अ‍ॅक्टिव्हेट 

  • सर्वप्रथम फोनमध्ये My Jio अ‍ॅप इंस्टॉल करा. 
  • त्यानंतर अ‍ॅपमध्ये लॉगइन करा. 
  • आता डावीकडे असलेल्या मेनू बटनवर टॅप करून सेटिंग्स पर्यायात जा. 
  • तिथे Do not disturb सिलेक्ट करा आणि तुमचा प्रिफरन्स निवडा.  
  • त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून मेसेज येईल कि, सात दिवसात तुमच्या नंबरवर DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट होईल.  

एयरटेल नंबरवर असे करा DND अ‍ॅक्टिव्हेट 

  • सर्वप्रथम Airtel च्या वेबसाइटवर जा आणि त्यानंतर ‘एयरटेल मोबाईल सर्विस’ बटणवर क्लिक करा. 
  • त्यानंतर स्क्रीनवर आलेल्या पॉप-अप बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. 
  • आता तुम्हाला फोनवर एक ओटीपी येईल, तो सबमिट करा.  
  • त्यानंतर Stop All Options वर टॅप करा. 
  • तुमच्या नंबरवर DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट होईल. 

वोडाफोन-आयडिया नंबरवर असे करा DND अ‍ॅक्टिव्हेट 

  • सर्वप्रथम Vi च्या वेबसाइटवरील DND पेजवर जा. 
  • इथे नाव, ईमेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका. 
  • त्यानंतर फुल DND ऑप्शनसाठी yes वर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल. 
  • हा ओटीपी सबमिट करा. 
  • आता तुमच्या नंबरवर डीएनडी सर्विस अ‍ॅक्टिव्हेट होईल. 

BSNL किंवा MTNL नंबरवर असे करा DND अ‍ॅक्टिव्हेट 

  • BSNL आणि MTNL नंबरवरून ‘START 0’ लिहून 1909 वर मेसेज पाठवा. मेसेज पाठवल्यानंतर डू नॉट डिस्टर्ब सर्विस अ‍ॅक्टिव्हेट होईल. 
  • मेसेजच्या ऐवजी तुम्ही 1909 वर कॉल करून देखील ही सर्विस अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. 
  • इतर कंपन्यांचे ग्राहक देखील 1909 वर कॉल आणि मेसेज करून डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅक्टिव्हेट करू  शकतात.  
टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय