शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ओपन सेलमधून मिळणार ऑनर ७ ए स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: July 26, 2018 11:10 AM

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपला ऑनर ७ ए हा स्मार्टफोन आता युजर्ससाठी ओपन सेलच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपला ऑनर ७ ए हा स्मार्टफोन आता युजर्ससाठी ओपन सेलच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. मे महिन्यात ऑनर ७ ए आणि ऑनर ७ सी हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. हे दोन्ही मॉडेल्स ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले होते. आजवर या मॉडेल्सला फक्त फ्लिपकार्टवर ‘फ्लॅश सेल’च्या माध्यमातूनच उपलब्ध करण्यात आले होते. तथापि, आता यातील ऑनर ७ ए हा स्मार्टफोन ग्राहक केव्हाही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकणार आहे. अर्थात आता हे मॉडेल ‘ओपन सेल’ या प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे.

ऑनर ७ ए या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा, १८:९ असे गुणोत्तर असणारा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आला अहे. याची रॅम ३ जीबी व स्टोअरेज ३२ जीबी आहे. या मॉडेलमध्ये १३ व २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांनी युक्त ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तर यामध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर यामधील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा इएमयुआर ८ हा युजर इंटरफेस दिला आहे. 

यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  ऑनर ७ ए या मॉडेलचे मूल्य ८,९९९ रूपये आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल