शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

अ‍ॅप्स चोरू शकतात युजर्सचा खासगी डेटा, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 10:08 AM

युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत.

ठळक मुद्देस्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत.युजर्सचा खासगी डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स फेसबुकसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावरही युजर्स सातत्याने अपडेट देत असतात. मात्र या दरम्यान युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत. स्मार्टफोनचा वापर हा दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केले जातो. ऑनलाईन बिल भरणं अथवा इतर काही कारणास्तव अनेक अ‍ॅप्स युजर्स फोनमध्ये इन्स्टॉल करत असतात.

अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना अ‍ॅप्स युजर्सकडे काही परमिशन मागतात. त्यानुसार युजर्स देखील कसलाही विचार न करता प्रत्येक गोष्टीसाठी ओकेवर क्लिक करतात. मात्र असं करणं युजर्सना महागात पडू शकतं. यामुळे युजर्सचा खासगी डेटा चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते. युजर्सचा खासगी डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स फेसबुकसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात. युजर्सच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारे होम पेजवर जाहिराती दाखवतात. जेणेकरून युजर्स त्या जाहिरातींकडे आकर्षित होऊन त्यावर क्लिक करतील. सर्च इंजिन गुगलने अपडेटेड प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पॉलिसीची घोषणा केली आहे. गुगल लवकरच अँड्रॉइडचं अपडेटेड व्हर्जन अँड्रॉइड Q लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राखण्यास मदत होणार आहे. 

अ‍ॅप्सच्या परमिशन अशा करा मॅनेज

- सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा. 

- सेटींगमध्ये अ‍ॅप्स हा पर्याय निवडा. 

- एखादे अ‍ॅप निवडून  त्याच्या परमिशन सेक्शनमध्ये जा.  

- अ‍ॅपसाठी परवानगी द्यायची आहे तिथं हो म्हणजेच टॉगल ऑन करा.

- ज्या अ‍ॅपसाठी परवानगी द्यायची नाही तिथे टॉगल ऑफ करा.

सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Pegasus नावाचा एक व्हायरस आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे फोन ट्रॅक करून त्यामध्ये असलेला डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो. 

Financial Times ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केलं आहे. NSO ग्रुपने टूल तयार केलं असून Google Drive किंवा iCloud चा डेटा अ‍ॅक्सेस करण्याची क्षमता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉनवर स्टोर असलेली सर्व माहिती हा व्हायरस चोरू शकतो. तसेच Apple iCloud देखील हॅक करू शकतो. त्यामुळेच युजर्सचा लोकेशन डेटा, आर्काइव्हड मेसेज आणि फोटो यांना धोका आहे. 

आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे महत्त्वाची खासगी माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गुगल अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञान