स्पॅम ई-मेलने त्रस्त झालात?; असं करा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:51 PM2020-01-07T14:51:32+5:302020-01-07T14:56:43+5:30

ई-मेलच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जातात.

here are three ways to block spam emails  | स्पॅम ई-मेलने त्रस्त झालात?; असं करा ब्लॉक

स्पॅम ई-मेलने त्रस्त झालात?; असं करा ब्लॉक

Next

नवी दिल्ली - बँकेचे व्यवहार, नोटिफिकेशन, पॉलिसी अपडेट यासारख्या प्रोफेशनलपासून पर्सनल गरजांसाठी ई-मेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. ई-मेलच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जातात. त्यामुळे युजर्सना मार्केटिंग आणि प्रोडक्ट्स प्रमोशनसंबंधीत खूप मेल येत असतात. सातत्याने येणारे अशाप्रकारचे मेल हे त्रासदायक ठरतात. तसेच अनेकदा अशा स्वरुपाच्या ई-मेलमुळे युजर्सचा डेटा चोरीला जाण्याची देखील शक्यता असते.

जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेक जण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात. सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे सातत्याने येत असतात. Gmail इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते. अशाप्रकाचे प्रमोशनल ईमेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स नको असलेल्या ईमेल्सनेच पूर्ण भरून जातो. असे मेल करणाऱ्यांना ब्लॉक करता येतं. कसं ते जाणून घेऊया. 

सेंडरला ब्लॉक करा

- सर्वप्रथम जीमेल अकाऊंट लॉग इन करा.

- ज्या सेंडरला ब्लॉक करायचं आहे त्याचा मेल ओपन करा.

- तीन व्हर्टिकल डॉटवर क्लिक करा.

- ब्लॉक ऑप्शनवर क्लिक करा. 

फिल्टरचा वापर करून ब्लॉक करा

- सर्वप्रथम जीमेल लॉग इन करा आणि ड्रॉप डाऊन बटणावर टॅप करा.

- To वाल्या रोमध्ये सेंडरचं नाव अथवा ई-मेल आयडी टाईप करा.

- फिल्टर ऑप्शनवर क्लिक करा.

- त्यानंतर डिलीट इट बटणावर क्लिक करा.

कीवर्डचा वापर करून ब्लॉक करा

- सर्च फिल्टरमध्ये जाऊन ब्लॉक करायचा आहे तो कीवर्ड टाईप करा.

- Promotions, sale, discounts, offers यासारखे शब्द टाईप करू शकता.

- ‘Has the word’ सेक्शनमध्ये जाऊन क्रिएट फिल्टरवर क्लिक करा आणि डिलीट इट ऑप्शनवर टॅप करा.

गुगलने आपली ईमेल सर्व्हिस जीमेलसाठी एक नवं फीचर लाँच केले आहे. 'डायनॅमिक ईमेल' असं या नव्या फीचरचं नाव असून हे फीचर लाँच झाल्यानंतर जीमेलच्या डिजाईनमध्ये अनेक बदल होणार आहेत. याचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे ईमेल्सना वेब पेजप्रमाणे अ‍ॅक्सेस करता येणार आहे. सध्या कंपनी हे फीचर अँड्रॉईड व आयओएससाठी रोलआऊट करणार आहे. लवकरच ग्लोबल युजर्सना ही सुविधा देण्यात येणार आहे.

'या' बातम्याही नक्की वाचा

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

व्हॉट्स अ‍ॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

काय सांगता? इंटरनेटशिवाय आता शेअर करता येणार फोटो, व्हिडीओ

 

Web Title: here are three ways to block spam emails 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.