‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 05:48 IST2025-12-22T05:48:24+5:302025-12-22T05:48:38+5:30
एका क्लिकवर हॅकर्सचा तुमच्या अकाउंटवर ताबा; केंद्र सरकारचा ‘घोस्टपेयरिंग’बद्दल धोक्याचा इशारा; मेसेज, फोटो आणि व्हिडीओवर हॅकर्सची छुपी नजर

‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तुमच्या व्हॉट्सॲपवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून ‘हा फोटो बघ’ असा मेसेज आलाय का? सावधान, तो मेसेज तुमच्या खासगी आयुष्यात डोकावणारा हॅकर असू शकतो. भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने व्हॉट्सॲपच्या ‘डिवाइस-लिंकिंग’ फीचरमधील एका मोठ्या तांत्रिक त्रुटीचा शोध लावला असून, याला ‘घोस्टपेयरिंग’ असे नाव दिले आहे. यातून गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंगशिवाय तुमच्या व्हॉट्सॲपवर पूर्ण ताबा मिळवू शकतात, असे समोर आले आहे.
व्हॉट्सॲपला दणका
व्हॉट्सॲपला एनसीएलएटीने मोठा दणका दिला आहे. जाहिरातींच्या हेतूने किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय शेअर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.
‘घोस्टपेयरिंग’ म्हणजे काय?
हॅकर्स स्वतःचे डिवाइस तुमच्या अकाउंटला अशा प्रकारे लिंक करतात की ते तुम्हाला सहज दिसत नाही.
यामुळे व्हॉट्सॲप वेबप्रमाणेच हॅकर रिअल-टाईममध्ये तुमचे सर्व मेसेज वाचू शकतो आणि तेथून इतरांना मेसेजही पाठवू शकतो.
कसा होतो हा ‘सायबर’ हल्ला?
सुरुवात एका लिंकने : युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून ‘हाय, हा फोटो बघ’ असा मेसेज येतो, ज्यामध्ये फेसबुकसारखी दिसणारी एक लिंक असते.
खोटी पडताळणी : लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट पेज उघडते, जिथे कंटेंट पाहण्यासाठी युजरला ‘व्हेरिफाय’ करायला सांगितले जाते.
सुरुवात एका लिंकने : युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून ‘हाय, हा फोटो बघ’ असा मेसेज येतो, ज्यामध्ये फेसबुकसारखी दिसणारी एक लिंक असते.
संपूर्ण ताबा : अनवधानाने युजर हा कोड वापरतो आणि हॅकरच्या ब्राउझरला आपल्या व्हॉट्सॲपशी लिंक करतो. यामुळे हॅकरला तुमच्या सर्व चॅट्स, फोटो, व्हिडीओंचा ॲक्सेस मिळतो.
हायजॅकपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
अनोळखी लिंक टाळा : कोणाकडूनही आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, मग ती व्यक्ती ओळखीची का असेना.
लिंक्ड डिवाइसेस तपासा : व्हॉट्सॲप सेटिंग्जमधील ‘लिंक्ड डिवाइसेस’मध्ये जाऊन कोणते अनोळखी डिवाइस लिंक आहे का, हे वेळोवेळी तपासा. असल्यास लगेच ‘लॉग आउट’ करा.
पेअरिंग कोड शेअर करू नका : व्हॉट्सॲपचा कोणताही ‘पेअरिंग कोड’ फोनवर विचारल्याशिवाय किंवा स्वतःहून गरज नसल्यास टाकू नका.
टू स्टेप व्हेरिफिकेशन : आपल्या व्हॉट्सॲपवर ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ नेहमी सुरू ठेवा.
मोबाइल कोणालाही देऊ नका : आपला मोबाइल कोणालाही देऊ नका. फसवणूक होऊ शकते.