Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:19 IST2025-10-16T16:18:15+5:302025-10-16T16:19:23+5:30

Happy Diwali Shubh Deepawali Wishes Stickers: जर तुम्हाला नवीन स्टिकर्स वापरून तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते कसे बनवायचे हे जाणून घ्या...

happy diwali stikers know how to make and send happy diwali stikers on whatsapp step by step | Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'

Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'

Happy Diwali Wishes Stickers: दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा पाठवतात. पूर्वी लोक मेसेज किंवा इमेज शेअर करायचे, पण आता स्टिकर्स पाठवण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्टिकर्स केवळ मजेदार नसून आपल्या भावना देखील चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. जर तुम्हाला यावेळी नवीन स्टिकर्स वापरून तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते कसे बनवायचे हे जाणून घ्या...

Meta AI च्या मदतीने WhatsApp वर बनवा दिवाळी स्टिकर्स

WhatsApp चं नवीन व्हर्जन अपडेट करा

सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp चं नवीन व्हर्जन अपडेट करा.

चॅट ओपन करा

आता, WhatsApp ओपन करा. Meta AI पर्यायावर क्लिक करा आणि थेट चॅटवर जा.

स्टिकर जनरेट करण्याची कमांड द्या

तुम्हाला हव्या असलेल्या स्टिकरच्या प्रकारासाठी येथे कमांड एंटर करा. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही खालील Prompts देखील टाइप करू शकता:

'Make a Happy Diwali sticker with diyas and lights' या

'Create a colorful Diwali greeting sticker with text ‘Happy Diwali''

असं केल्याने, मेटा एआय काही सेकंदात तुमच्यासाठी एआय-जनरेटेड स्टिकर तयार करतील.

हे स्टिकर्स कसे शेअर करायचे?

मेटा एआय स्टिकर्स तयार केल्यानंतर, तुमच्या आवडत्या स्टिकरवर टॅप करा आणि ते सेव्ह करा.

आता, ज्या व्यक्तीला तुम्हाला स्टिकर पाठवायचा आहे त्याचं चॅट उघडा, कीबोर्डवर जा आणि स्टिकर्स पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला येथे तुम्ही तयार केलेले स्टिकर्स दिसतील. त्यावर टॅप करून तुम्ही ते पाठवू शकता.

या टिप्स ठरतील उपयुक्त

जसे तुम्हाला स्टिकर्स हवे असतील तशी तुम्ही मेटा एआयला अधिक माहिती देऊ शकता, जसं की,

'Make a Happy Diwali sticker with diyas and Rangoli in background'

'Create a Diwali sticker with Ganesh-Lakshmi idols and lights'

'Generate a funny Diwali sticker saying ‘No crackers, only sweets''

मेटा एआय तुमच्या तपशीलांवर आधारित एक अद्वितीय स्टिकर तयार करतं. तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीमध्ये कमांड एंटर करू शकता. स्टिकरसाठी स्पष्ट सूचना देण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या प्रियजनांना एका अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Web Title : मेटा एआई का उपयोग करके दिवाली के लिए व्हाट्सएप स्टिकर बनाएं

Web Summary : मेटा एआई के साथ खास दिवाली व्हाट्सएप स्टिकर बनाएं! व्हाट्सएप अपडेट करें, 'दीयों के साथ हैप्पी दिवाली' जैसे संकेत का उपयोग करें और अपने प्रियजनों के साथ व्यक्तिगत रूप से त्योहार की शुभकामनाएं साझा करें।

Web Title : Create personalized Diwali WhatsApp stickers using Meta AI: Guide

Web Summary : Create unique Diwali WhatsApp stickers with Meta AI! Update WhatsApp, use prompts like 'Happy Diwali with diyas,' and share festive greetings in a personalized way with your loved ones.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.