अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:17 IST2025-12-06T20:15:41+5:302025-12-06T20:17:27+5:30
ग्रोक केवळ सेलिब्रिटींचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्याही घराचा पत्ता सांगत आहे.

अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
एलॉन मस्कची AI कंपनी xAI चा चॅटबॉट ग्रोक सध्या वादात अडकला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, बॉट घराचे पत्ते, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि अगदी सामान्य लोकांच्या कुटुंबाची माहिती देखील शेअर करत आहे. Futurism च्या तपासणीत ट्विटरमध्ये समाविष्ट केलेलं हे एआय मॉडेल कोणाचेही पत्ते शोधण्यास आणि सांगण्यास धोकादायक असल्याचं सिद्ध होत आहे.
रिपोर्टनुसार, ग्रोक केवळ सेलिब्रिटींचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्याही घराचा पत्ता सांगत आहे. एका प्रकरणात, त्याने बारस्टूल स्पोर्ट्सचे संस्थापक डेव्ह पोर्टनॉय यांचाही योग्य पत्ता त्वरित सांगितला. त्याहूनही चिंताजनक म्हणजे ग्रोकने प्रसिद्ध नसलेल्या लोकांसोबतही असंच काहीसं केलं आहे.
तपासादरम्यान, ग्रोकने फक्त नाव, पत्ता टाइप करताच आश्चर्यकारक गोष्टी दिल्या. ३३ रँडम नावांपैकी त्याने १० जणांच्या सध्याचे घराचा पताते, ७ लोकांच्या जुन्या घराचा पत्ता आणि ४ जणांच्या ऑफिसचा पत्ता संकोच न करता दिला.
काही चॅटमध्ये, ग्रोकने युजर्सना दोन पर्याय दिले: Answer A आणि Answer B, ज्यामध्ये दोन्हीमध्ये नावं, फोन नंबर आणि अगदी घराचे पत्ते होते. बर्याच प्रकरणांमध्ये, त्याने फक्त पत्ता विचारून संपूर्ण पर्सनल डॉसियर देखील तयार केलं. हे वर्तन चॅटजीपीटी, गुगल जेमिनी आणि क्लाउड सारख्या इतर एआय मॉडेल्सच्या अगदी विरुद्ध आहे, जे प्रायव्हसी नियमांचा हवाला देऊन अशी माहिती देण्यास नकार देतात.
xAI नुसार, ग्रोककडे "हानिकारक रिक्वेस्ट" रोखण्यासाठी फिल्टर आहेत, परंतु रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की हे फिल्टर डॉक्सिंग, स्टॉल्किंग किंवा पर्सनल माहिती शेअर करण्यास स्पष्टपणे प्रतिबंधित करत नाहीत. xAI चे धोरण अशा वापरास प्रतिबंधित करतं, तरीही ग्रोकचे प्रतिसाद सूचित करतात की हे सुरक्षा फिल्टर योग्यरित्या कार्य करत नाहीत.
ग्रोक कदाचित ऑनलाइन उपलब्ध सार्वजनिक डेटा, सोशल मीडिया लिंक्स आणि डेटा-ब्रोकर प्लॅटफॉर्म एकत्र करून ही माहिती प्रदान करतं. समस्या अशी आहे की हे एआय या डेटाला जलद पद्धतीने एकत्रित करतं. ते सोप्या आणि धोकादायक पद्धतीने सादर करतं.