Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 01:15 PM2021-12-14T13:15:56+5:302021-12-14T13:17:39+5:30

CERT-In च्या रिपोर्टनुसार, समोर आलेल्या दोषांचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या खाजगी माहितीचा वापर करू शकतात. तसेच डिवाइसमध्ये मालवेयर इंजेक्ट करू शकतात.

Government warning for chrome users update your browser immediately to avoid big loss  | Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा 

Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा 

Next

गुगल क्रोम ब्राउजरचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. त्यामुळं अशा युजरसाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रेस्पॉन्स टीम (CERT-In) नं गुगल क्रोम युजर्सना इशारा दिला आहे. क्रोममध्ये दोष सापडल्यामुळे युजर्सची खाजगी माहिती धोक्यात आहे, तसेच डिवाइसमध्ये मालवेयरचा शिरकाव होण्याचा धोका आहे. यावर उपाय देखील या सूचनेतून सांगण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, हा दोष गुगलनं दुरुस्त केला आहे आणि त्यासाठी एक अपडेट जारी केला आहे. त्यामुळे सरकार सोबतच Google नं देखील युजर्सना नवीन क्रोम इन्स्टॉल करण्याची सूचना दिली आहे. या अपडेटमध्ये 22 सिक्यॉरिटी फिक्स दिले आहेत. हे दोष बाहेरील रिसर्चर्सनी गुगलच्या निदर्शनास आणून दिले आहेत.  

CERT-In च्या रिपोर्टनुसार, समोर आलेल्या दोषांचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या खाजगी माहितीचा वापर करू शकतात. तसेच डिवाइसमध्ये मालवेयर इंजेक्ट करू शकतात, जो अजून नुकसान करू शकतो. कंपनीनं ही समस्या सोडवण्यासाठी पॅच जारी केला आहे आणि युजर्सना शक्य तितक्या लवकर आपला ब्राउजर अपग्रेड करण्यास सांगितलं आहे. 

अशाप्रकारे मिळावा Google Chrome ब्राउजरचा अपडेट 

  • Google Chrome च्या सेटिंग्समध्ये जा  
  • Help मधील Google Chrome च्या About सेक्शन मध्ये जा  
  • इथे तुमच्या क्रोमचे व्हर्जन चेक करा    
  • तुमच्याकडे अपडेट उपलब्ध झाला असेल तर अपडेट करून घ्या.   

हे देखील वाचा: 

फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी

पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर

Read in English

Web Title: Government warning for chrome users update your browser immediately to avoid big loss 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.