शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लवकरच येणार गुगलचा स्वतंत्र एआर हेडसेट

By शेखर पाटील | Updated: May 21, 2018 13:15 IST

गुगल एआर म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र हेडसेट विकसित करत असून लवकरच याला बाजारपेठेत सादर केले जाणार आहे.

गुगल एआर म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र हेडसेट विकसित करत असून लवकरच याला बाजारपेठेत सादर केले जाणार आहे. ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे विस्तारीत सत्यता होय. याला परिधान करणारा युजर आपल्या भोवतीच्या वातावरणात काल्पनीक रंग भरू शकतो. उदाहरणार्थ मी माझ्या घरात बसून याला परिधान केल्यानंतर माझ्या भोवती फुले पडत असल्याचा आभास यातून निर्माण करता येईल. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आधीच या प्रकारातील होलोलेन्स हे उपकरण बाजारपेठेत सादर केले आहे. तथापि, गुगलचे ए६५ हे प्रॉडक्ट यापेक्षा थोडे वेगळे असेल असा दावा करण्यात येत आहे.

या संदर्भात विनफ्युचर या जर्मन टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार गुगलचे ए६५ हे स्टँडअलोन अर्थात स्वतंत्र हेडसेट या प्रकारातील मॉडेल असेल. म्हणजेच कोणत्याही उपकरणाला कनेक्ट न करतांनाही याचा वापर करता येईल. यात क्वॉलकॉम या कंपनीने विकसित केलेल्या क्युएससी६०३ या प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. या हेडसेटमध्ये अतिशय उच्च दर्जाचा कॅमेरा आणि सेन्सरचा वापरदेखील केलेला असेल.  याच्या मदतीने युजर आपल्या भोवताली हव्या त्या पध्दतेचे प्रोजेक्शन करू शकणार आहे. तर यात दर्जेदार मायक्रोफोनसह गुगल असिस्टंटदेखील असेल. यामुळे युजर व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकणार आहे.

गुगलने आधीच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित गुगल ग्लास आणि डे-ड्रीम ही उपकरणे सादर केेलेली आहेत. यातील गुगल ग्लासबाबत पहिल्यांदा खूप औत्सुक्याचे वातावरण होते. तथापि, याला बाजारपेठेत फारसा प्रतिसाद लाभला नाही. यामुळे याचे उत्पादन बंद करण्यात आले असून याला नवीन स्वरूपात सादर करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर, गुगलच्या आगामी हेडसेटकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान