गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:24 IST2025-04-16T14:23:53+5:302025-04-16T14:24:02+5:30
भारतात Google Dot co Dot in, तर फ्रान्समध्ये Google Dot fr असे ब्राऊझरच्या अॅड्रेसबारमध्ये दिसायचे.

गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
गुगल आपले डोमेन बदलणार आहे. जगभरातील युजर्सना हा बदल पहायला मिळणार आहे. विविध देशांनुसार गुगलचे वेगवेगळे डोमेन होते, ते आता एकच केले जाणार आहे.
भारतात Google Dot co Dot in, तर फ्रान्समध्ये Google Dot fr असे ब्राऊझरच्या अॅड्रेसबारमध्ये दिसायचे. ते आता थेट गुगल डॉट कॉम असे होणार आहे. नवीन बदलानुसार गुगल कंट्री कोड हटविणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुगलकडून या लोकल डोमेनचा वापर केला जात होता.
युजर कोणत्याही देशातून वापर करत असला तरी गुगल त्यांना त्यांच्या देशासह जगभरातील साईट्स, डेटा दाखवत होते. २०१७ पासून ही सुविधा सुरु झाली होती. ती आता बंद करण्यात येत आहे. यासाठी काही महिने लागू शकतात. अपडेट लवकरच सर्व युजरपर्यंत पोहोचणार आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही देशाची गुगल लिंक टाकलीत तरी ती आपोआप गुगल डॉट कॉमवर रिडायरेक्ट केली जाणार आहे.
तुम्ही केलेल्या सर्च डेटावर याचा काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला आता जसा रिझल्ट मिळणार तोच नंतरही मिळणार आहे. यामध्ये काही सेटिंग असू शकतात, ज्या केल्यावर तुम्हाला तुमचा देश, भाषा आदी निवडता येणार आहे. तसेच यानंतर तुम्हाला तुमच्या आसपासचा डेटा मिळू शकणार आहे. यामुळे जर तुम्हाला युआरएलमध्ये गुगल को डॉट इन असे दिसले नाही तर घाबरून जाऊ नका, ती वेबसाईट स्पूफिंग नसणार आहे. परंतू, पूर्णपणे विश्वासही ठेवू नका. कारण तुमच्यासोबत या बदलाचा फायदा घेऊन फ्रॉडही होऊ शकतो. यामुळे सावध राहण्याची गरज आहे.