गुगलने प्रसिद्ध अ‍ॅप बंद केले; गुगल मॅप वापरण्याच्या सूचना

By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 02:11 PM2020-10-19T14:11:04+5:302020-10-19T14:12:10+5:30

Trusted Contacts app close: गुगलने गेल्या काही काळापासून फारशी वापरात नसलेली अ‍ॅप बंद केली आहेत. मात्र, ट्रस्टेड कॉन्टॅक्ट हे अ‍ॅप प्रसिद्ध होते. गुगलने याआधी गुगल लॅटिट्यूड गूगल+ लोकेशन शेअरिंग अ‍ॅप बंद केले होते. गुगल त्याची सेवा सुधारण्यासाठी चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

Google shuts down anather famous app Trusted Contacts; usE Google Maps | गुगलने प्रसिद्ध अ‍ॅप बंद केले; गुगल मॅप वापरण्याच्या सूचना

गुगलने प्रसिद्ध अ‍ॅप बंद केले; गुगल मॅप वापरण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देलोकेशन शेअरिंग आता गुगुल मॅपसोबत जोडण्यात आले आहे. गुगलने आता हळूहळू हँगआऊट बंद करण्याची तयारी सुरु केली आहे.आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय.

गुगल (Google) ने Trusted Contacts हे अ‍ॅप बंद केले आहे. गुगलचे हे अ‍ॅप अ‍ॅपल प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे. 1 डिसेंबर 2020 पासून या अ‍ॅपचा सपोर्टही बंद करणार असल्याचे गुगलने सांगितले.  


गुगलने गेल्या काही काळापासून फारशी वापरात नसलेली अ‍ॅप बंद केली आहेत. मात्र, ट्रस्टेड कॉन्टॅक्ट हे अ‍ॅप प्रसिद्ध होते. गुगलने याआधी गुगल लॅटिट्यूड गूगल+ लोकेशन शेअरिंग अ‍ॅप बंद केले होते. गुगल त्याची सेवा सुधारण्यासाठी चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 


गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट हे अ‍ॅप 2016 मध्ये लाँच केले होते. या अ‍ॅपद्वारे युजर त्यांच्या फेव्हरिट कॉन्टॅक्टसोबत डिव्हाईस अ‍ॅक्टिव्हिटी स्टेटस आणि लोकेशन शेअर करता येत होते. सुरुवातीला कंपनी बी सेवा केवळ अँड्रॉईड युजरसाठी देत होती. मात्र, नंतर हे अ‍ॅप iOS साठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध केले आहे. 


गुगल मॅपने वळणाचा अंदाज चुकवला; पुलावरून कारसह थेट पाइपलाईनवर कोसळला

ट्रस्टेड कॉन्टॅक्ट अ‍ॅप वापरणाऱ्या युजरना कंपनीने मेल करून याची माहिती दिली आहे. लोकेशन शेअरिंग आता गुगुल मॅपसोबत जोडण्यात आले आहे. यामुळे ट्रस्टेड कॉन्टॅक्टची आता गरज राहिलेली नाही. यापुढे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार नाही. ज्या युजरकडे हे अ‍ॅप आधीपासून आहे ते 1 डिसेंबरनंतर वापरू शकणार नाहीत, असे गुगलने या मेलमध्ये म्हटले आहे.


हँगआऊट बंद करण्याची तयारी
याप्रकारे गुगलने आता हळूहळू हँगआऊट बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. हँगआऊट युजरना चॅटमध्ये शिफ्ट करणे सुरु केले आहे. गुगल चॅट आता गुगल वर्कस्पेसचा भाग आहे. गुगलने वर्कस्पेसच्या G-suite रीब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. नोव्हेंबर 2020 पासून सर्व युजरना गुगलकडून व्हिडीओ कॉलिंगसाठी हँगआऊट ऐवजी Meet वापरण्याचे सांगितले जाणार आहे. पुढील वर्षीपासून हँगआऊटचा सपोर्टही काढून घेतला जाणार आहे. 
 

गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय. कोणतीही वस्तू असेल की फोटो किंवा नोकरी तुम्हाला गुगलच त्या त्या संबंधित वेबसाईटची लिंक पुढ्यात आणून ठेवते. परंतू आता गुगल तुमची जॉब कन्सल्टन्सी होणार आहे. होय काहीसे असेच अ‍ॅप गुगलने भारतात लाँच केले आहे. ज्यावर कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या थेट कळणार आहेत. 

Paytm ची पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर 'वापसी'

Google Kormo App for Jobs Search in India: गुगलने कॉर्मो नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे असे अ‍ॅप आहे जे भारतातील करोडो बेरोजगारांना मदतगार ठरणार आहे. हे अ‍ॅप एन्ट्रीलेव्हल जॉब शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. टेक क्रंचअनुसार गुगलने कॉर्मो जॉब्स (Kormo Jobs) हे अ‍ॅप पेमेंट सोल्यूशन गुगल पे (Google Pay) मध्ये जॉब स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतात हे अ‍ॅप जॉब स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगलने हे अ‍ॅप भारताचा छोटा शेजारी बांग्लादेशमध्ये 2018 मध्ये लाँच केले होते. यानंतर इंडोनेशियामध्येही लाँच केले होते. आता हे अ‍ॅप भारतात आणण्यात आले आहे. 

Web Title: Google shuts down anather famous app Trusted Contacts; usE Google Maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल