google saves all your voice data this is how you can delete audio voice commands data | गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्स
गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्स

ठळक मुद्दे गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स ऐकू शकतात.गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे.

नवी दिल्ली - गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल असिस्टंटच्या मदतीने व्हॉईस कमांड्स देऊन अलार्म सेट करणं, हवामानाचा अंदाज घेणं किंवा घरातली इतर उपकरणं हाताळणं यासारखी कामंही करता येतात. हे सगळं करत असताना युजर्सची  सुरक्षितता महत्त्वाची असते. मात्र गुगलकडे युजर्सनी दिलेल्या सर्व कमांड्सचे रेकॉर्डिंग असते. गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. 

गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स ऐकू शकतात. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आवश्यक ते बदल करता यावेत यासाठी हा डाटा सेव्ह केला जातो. असं असलं तरी गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे. युजर्स आपल्या आवाजात सेव्ह असलेल्या कमांड्स कशा डिलीट करायच्या हे जाणून घेऊया. 

वेब ब्राउजरसाठी 

- संगणकावर सर्वप्रथम वेब ब्राउजर ओपन करा आणि 'myactivity.google.com' वर जा. 

- स्क्रीनच्या (उजव्या) बाजूला 'Delete Activity by' यावर क्लिक करा. 

- 'All time' हा पर्याय वापरून सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजही डिलीट करता येतात. 

- ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये जाऊन ‘Voice and audio' हा पर्याय निवडा. 

- या नंतर पॉप-अप मेन्यू येईल; तिथे 'Delete' हा पर्याय निवडा. 

स्मार्टफोनसाठी 

- गुगल अ‍ॅप ओपन करा.

-  स्क्रीनच्या खाली असणाऱ्या 'more' या पर्यायावर टॅप करा. 

- 'search activity' वर टॅप करा. 

- यामुळे तुम्ही 'myactivity.google.com' वर जाल.

- डाव्या बाजूला वरती तीन रेषा असलेल्या पर्यायावर टॅप करा आणि 'Delete Activity by' हा पर्याय निवडा. 

- वेब ब्राउजरप्रमाणे ‘voice and audio' हा पर्याय दिसेल. 

- 'Delete' हा पर्याय निवडा. 

Google Chrome App वरही आता 'डार्क मोड'

गुगल काही दिवसांपासून आपल्या अ‍ॅप्ससाठी डार्क मोड फीचरची चाचणी करत होतं. त्यानंतर आता  गुगलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड हे फीचर आणले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड क्रोम अ‍ॅपमध्ये हे फीचर लेटेस्ट स्टेबल अपडेट डाउनलोड करणाऱ्या युजर्सला उपलब्ध आहे. या बरोबरच गुगल आपल्या ब्राऊझरमध्ये नव्या रीडर मोडचीही चाचणी करत आहे. हे रीडर मोड सध्या डेस्कटॉप युजर्ससाठी क्रोम कॅनरीवर उपलब्ध आहे. रीडर मोडमध्ये गरज नसलेला सर्व कंटेंट निघून जाऊन फक्त आर्टिकल टेक्स्ट आणि फोटो पानावर दिसणार हे या फीचरचे वैशिष्ट्य आहे. या बरोबरच 'मॅन इन द मिडल' (MiTM) फिशिंग अ‍टॅक रोखण्यासाठी ब्राऊझर फ्रेमवर्क अद्ययावत करण्याचे गुगलचे काम सुरू आहे. गुगलच्या युजर्सला क्रोमच्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपवर डार्क मोडची मदतही मिळत आहे. हा मोड क्रोम v74 फॉर अ‍ॅन्ड्रॉईड रिलीजमध्ये उपलब्ध आहे. 

 


Web Title: google saves all your voice data this is how you can delete audio voice commands data
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.