Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:52 PM2022-10-31T16:52:20+5:302022-10-31T16:53:58+5:30

हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत.

Google Removes These 13 Dangerous Apps From Play Store Delete It From Your Phone Immediately check list | Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

googlenewsNext

गुगलने नुकतेच 13 अ‍ॅप्स Play Store वरून हटविले आहेत. हे अ‍ॅप्स 20 मिलियन पेक्षाही अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. या अ‍ॅप्समध्ये त्रुटी आढळून आल्याने ते प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. या अ‍ॅप्समुळे फोनची बॅटरी लवकर संपते. याशिवाय हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत. 

McAfee Mobile Research Team च्या रिसर्चरने या अ‍ॅप्स संदर्भात रिपोर्ट केले होते. यावर अ‍ॅक्शन घेत गूगलने या मलेशिअस अ‍ॅप्सना गूगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये सातत्याने रन करत होते आणि फसवणूक करण्यासाठीही वापरले जात होते. जर आपणही आपल्या अ‍ॅन्ड्रॉइड फोनमध्ये हे अ‍ॅप्स इंस्टॉल केले असतील तर आपणही हे अ‍ॅप्स डिलीट करायला हवेत.

अशा फ्रॉड मलेशिअस अ‍ॅप्ससंदर्भात वेळोवेळी इशारे दिले जात असतात. हे अ‍ॅप्स युजर्सच्या डेटाची चोरी करतात. एवढेच नाही, तर याशिवाय, अनेक फायनांशिअल फ्रॉड अ‍ॅक्टिव्हिटीही करतात.
 
त्वरित डिलीट करा हे अ‍ॅप्स  - 
जर आपण ​High Speed Camera, ​SmartTask, ​Flashlight+, ​Memo calendar, ​English-Korean Dictionary, BusanBus, ​Quick Notes, ​Smart Currency Converter, ​Joycode, ​EzDica, ​Instagram Profile Downloader, ​Ez Notes या Image Vault - Hide Images हे अ‍ॅप्स डाउनलोड केले असतील, तर ते त्वरित आपल्या फोनमधून डिलीट करा.

Web Title: Google Removes These 13 Dangerous Apps From Play Store Delete It From Your Phone Immediately check list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.